गायक राहुल वैद्य याचा गाण्याच्या शोचा हा व्हिडीओ. ज्यात तो गाणी गाताना दिसतो आहे. बॉलिवूडच्या जुन्या फिल्ममधील ही गाणी आहेत आणि समोर अजित पवार बसलेले दिसत आहेत. जे अगदी मन लावून राहुल वैद्य गात असलेली गाणी ऐकत आहेत.
Devkhel वेबसीरिजवरून वाद! पण देवखेळ म्हणजे नेमकं काय? अंकुश चौधरीनेच सांगितलं
advertisement
राहुल वैद्यने पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार हा 6 डिसेंबर 2025 चा व्हिडीओ आहे. अजितदादांनी मला त्यांची आवडती गाणी गायला लावली. जवळपास सलग 2 तास मी त्यांच्या आवडीची गाणी गात होतो. पण ही त्यांची शेवटची भेट असेल असा विचारही मी केला नव्हता. अजित दादा पवार तुम्ही लवकर गेलात. कायम लक्षात राहाल. तुमच्या आत्म्यास शांती लाभो दादा, ओम शांती. अशी पोस्ट त्याने केली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामतीत प्लेन क्रॅशमध्ये मृत्यू झाल्यावर त्यांच्या कुटुंबासह अनेकांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अजित पवारांच्या निधनाच्या बातमीवर अजूनही कित्येकांचा विश्वास बसत नाही आहे.
अजित पवारांचं कुटुंब फिल्म इंडस्ट्रीशी जोडलेलं होतं. त्यांचे वडील अनंतराव पवार हे दिग्दर्शक व्ही शांताराम यांच्यासोबत बराच काळ काम करत होते. अजित पवार यांनीही ते सगळं जवळून पाहिलं होतं.
