आलियानं 6 नोव्हेंबर 2022 रोजी लेक राहाला जन्म दिला. राहाच्या जन्माच्या आधी 14 एप्रिल रोजी आलिया आणि रणबीर यांनी लग्न केलं. राहाचा जन्म हा आलिया आणि रणबीरच्या आयुष्यातील खुप मोठा क्षण होता. जन्मापासून दोघांनी लेकीचा चेहरा सर्वांपासून लपवून ठेवला होता. पण आता राहा एक वर्षांची झाल्यानंतर आलिया आणि रणबीर यांनी ख्रिसमसच्या दिवशी तिचा चेहरा सर्वांसमोर आणला.
advertisement
राहाचा चेहरा पहिल्यांदा समोर आल्यानंतर राहा हि तिचे आजोबा ऋषी कपूर यांच्यासारखी दिसते असंही अनेकांनी म्हटलं. गोरीपान, क्यूट आणि निळ्या डोळ्यांच्या राहाला सगळ्यांचं प्रचंड प्रेम आणि आशिर्वाद मिळाले.
राहाच्या जन्मानंतर 1-2 महिन्यात आलियानं तिचं काम सुरू केलं. आलिया लेकीला घेऊन शुटींगला देखील जाते. शुटींगला गेल्यानंतर मात्र राहाची सर्वाधिक काळजी घेणं महत्त्वाचं असतं. इतर लहान मुलांसारखी राहा देखील सारखी तोंडात बोटं घालते. त्यामुळे तिची सवय कमी करण्यासाठी आलिया एक खास वस्तू तिच्याबरोबर ठेवते.
आलियाचा एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यात ती तिच्या बॅगेत कोण कोणत्या वस्तू ठेवते हे सांगतेय. आलिया सांगतेय, 'मी सध्या लंडनमध्ये आहे आणि मी माझ्या मुलीबरोबर बागेत किंवा इतर ठिकाणी खूप फिरतेय. त्यामुळे तिच्यासाठी मी छोटे छोटे सॉफ्ट रूमाल माझ्या बॅगेत ठेवते. जेणेकरून मी पटकन तिचं तोंड पुसू शकेन.' त्यानंतर आलिया तिच्या बॅगेत मिटन्स कॅरी करते. मिटन्स म्हणजेच लहान बाळांच्या हातात घालण्यासाठी लागणारे छोटे छोटे सॉक्स. आलिया म्हणाली, 'तिला हातात मिटन्स घातलेले अजिबात आवडत नाहीत. ती सतत ते काढण्याच्या मुडमध्ये असते. ती तोंडाने ते काढायचा प्रयत्न करत असते. त्यामुळे ते बऱ्याचदा खराब होतात म्हणून एक्स्ट्रा मिटन्स देखील बॅगेत कॅरी करते.'