मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेता अरबाज खान अभिनेत्री आणि मॉडेल जॉर्जिया एंड्रियानीबरोबर ब्रेकअप झाल्यानंतर त्याच्या आयुष्यात नवं प्रेम आलं आहे. कोण आहे अरबाजची होणारी बायको पाहूयात. अरबाज हा सलमान खानचा सख्खा भाऊ आहे. दोघांना एक बहिण आहे जिचं नाव अलविर खान अग्निहोत्री. अरबाज हा सलमान खानचा मोठा भाऊ आहे.
न्यूज 18च्या रिपोर्टनुसार, अरबाजच्या गर्लफ्रेंडच नाव शौरा खान असं आहे. शौराचं अभिनेत्री रवीना टंडन हिच्या खास कनेक्शन आहे. अरबाज आणि शौर त्यांच्या रिलेशनमध्ये खूप सीरियस आहेत. दोघांना त्यांचं नाव लग्नापर्यंत घेऊन जाण्याचा त्यांचा मानस आहे.
advertisement
हेही वाचा - Dunki First Review : शाहरूखचा डंकी बॉलिवूडचा 'मास्टरपीस'; प्रेक्षक रिव्ह्यू काय म्हणतोय?
अरबाज आणि शौरा त्यांच्या लग्नाचं प्लानिंग करत असून ते जवळचे मित्र मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या उपस्थितीत त्यांचं लग्न करणार आहेत. दोघांना त्यांचं लग्न जवळच्या माणसांमध्ये करायचं आहे. असं असलं तरी अरबाजनं त्याच्या नात्याबद्दल अद्याप अधिकृत माहिती दिलेली नाही.
अरबाज खान पटना या त्याच्या अपकमिंग सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याच सिनेमाच्या सेटवर त्याची आणि शौराची भेट झाली होती. अरबाज खान यावेळी कोणत्याही अभिनेत्री प्रेमात नाही तर एका मेकअप आर्टिस्टच्या प्रेमात पडला आहे. शौरा ही अभिनेत्री रवीना टंडन आणि मुलगी राशा यांची मेकअप आर्टिस्ट आहे.
2017मध्ये अरबाज आणि मलायका यांचं लग्न झालं. परंतू एका मुलाच्या जन्मानंतर त्यांचं नातं फार काळ टिकू शकलं नाही. मलायकाबरोबरच्या घटस्फोटानंतर अरबाज जॉर्जिया हिच्या प्रेमात पडला होता. पण त्यांचं नातं फार काळ टिकू शकलं नाही.
