शूराला प्रपोज करणाऱ्या अरबाजचा व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळतोय. शूराच्या फॅन पेजवरून इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात अरबाजचं संपूर्ण कुटुंब दिसतंय. सगळे डान्स करत असतात आणि मध्येच अरबाज शौराचा हात धरून गुडघ्यावर बसतो आणि फुलांचा मोठा गुच्छा तिच्या हातात ठेवत तिला प्रपोज करतो. या व्हिडीओ अरबाजची बहिण अर्पिता देखील दिसत आहे. शौरानं अत्यंत लाजत अरबाजचं प्रपोजल स्वीकारताना दिसतेय.
advertisement
हेही वाचा - बॉबीच्या 'जमाल कडू'ची धर्मेंद्र यांना भुरळ; ग्लास हातात घेत लेकाच्या गाण्यावर धरला ठेका, VIDEO
या व्हिडीओमध्ये महत्त्वाचं म्हणजे अरबाजचा मुलगा अरहान हा देखील तिथे उपस्थित होता. अरबाजनं मुलाच्या समोरच दुसरी बायको शूरा हिला प्रपोज केलं. अरबाज आणि शूराचा हा व्हिडीओ त्यांच्या लग्नाच्या 5 दिवस आधीचा आहे. 24 डिसेंबर 2023 रोजी अरबाज आणि शूरा यांनी लग्न केलं. बहिण अर्पिताच्या बंगल्यावर दोघांचा छोटेखानी निकाह सोहळा पार पडला. खान कुटुंब आणि बॉलिवूडमधील काही जवळची मंडळी या लग्नाला उपस्थित होते.
अरबाज आणि शूरा यांच्या लग्नाचे काही खास क्षण कॅमेरात कैद करण्यात आलेत. ज्यात खान कुटुंबानं मोठ्या उत्साहानं आणि आनंदानं नव्या सुनेचं स्वागत केलं. अरबाजचा मोठा मुलगा अरहान यानं देखील त्याच्या नव्या आईचं स्वागत करण्यासाठी खास गाणं सादर केलं. दोघांनी तेरे मस्त मस्त दो नैन या गाण्यावर डान्स देखील केला.