लॅरिसा बोनेसी आर्यन खानपेक्षा 8 वर्षांनी मोठी आहे. तिनं अक्षय कुमार आणि जॉन अब्राहमसोबत काम केलं आहे. देसी बॉईजच्या ‘सुबाह होने ना दे’ या गाण्याने लॅरिसाने तिच्या बॉलिवूड करिअरची सुरुवात केली होती. लॅरिसाने साऊथ इंडस्ट्रीतही काम केलं आहे. त्याने ‘नेक्स्ट एनी’ आणि ‘थिक्का’ सारख्या चित्रपटात काम केलं आहे. तिने बॉलिवूडमध्ये सैफ अली खानसोबतही काम केलं आहे. लॅरिसाने सैफसोबत 'गो गोवा गॉन' या चित्रपटात काम केलं होतं. आता आर्यन आणि लॅरिसा यांचा एका पार्टीतील व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडिओत लॅरिसा आर्यनसोबत असं काही करताना दिसतेय की जे पाहून तो लाजतो. आर्यनचं हे रूप नेटकऱ्यांनी पहिल्यांदाच पाहिलं आहे.
advertisement
वयाच्या पस्तिशीत बांधली लग्नगाठ; गर्भपातानंतर अखेर 41 व्या आई झाली प्रसिद्ध अभिनेत्री
व्हिडिओमध्ये आर्यन खान मार्टिन गॅरिक्सच्या शेजारी उभा असलेला दिसत आहे आणि बॅकग्राउंडमध्ये लॅरिसा दिसत आहे. ती या पार्टीत फुल्ल धम्माल करताना दिसतेय. आर्यन ज्या प्रकारे लॅरिसाला बघून हसत आहे, तसंच फ्लाईंग किस देताना दिसत आहे. या व्हिडिओवर अनेक यूजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
नुकताच आर्यनचा एक व्हिडिओ समोर आला होता, ज्यामध्ये स्टार किड लारिसा बोनेसीच्या कुटुंबासोबत दिसली होती. आर्यनने लॅरिसाची आई रेनाटा बोन्सीला त्याच्या स्वतःच्या कंपनीचं D'YAVOL X जॅकेटही दिलं होतं. रेनाटा बोन्सी नुकतीच मुंबईत आली होती जिथे आर्यनने तिला हे गिफ्ट दिलं होतं. यामुळे त्यांच्या डेटिंगच्या अफवांना आणखी खतपाणी मिळालं.
Another video of Aryan and Larissa at the Martin Garrix from the Martin Garrix Afterpartyadvertisement
या दाव्यावर आर्यन खान आणि शाहरुखकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. सध्या आर्यन त्याच्या पहिल्या दिग्दर्शनाच्या स्टारडम मालिकेची तयारी करत आहे. आर्यन खानची ही सिरीज पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.