आर्यन खानने या सिरीजमध्ये एका एनसीबी ऑफिसरचा रोल दाखवला आहे, जे एनसीबी ऑफिसर समीर वानखेडेंसारखे होते. यामुळे समीर वानखेडेंनी दिल्ली हायकोर्टमध्ये शाहरुख आणि त्याच्या प्रोडक्शन कंपनीवर मानहानीची दावा दाखल केला. या विवादावर आर्यन खानने आपली सिरीज बनवतानाचे अनुभव सांगितले आहेत.
दीपिकाच्या '8 तास शिफ्ट' डिमांडला आणखी एका अभिनेत्रीचा पाठिंबा! म्हणाली, 'आम्हालाही वीक ऑफ हवा'
advertisement
आर्यन खानने एका वैरायटी मुलाखत देताना म्हणाला, "आम्हाला ह्युमर दाखवायचा होता, परंतु कोणाचाही अपमान करायचा नव्हता. त्यामुळे मला वाटते की, आम्ही एक मर्यादा ठेऊन काम केले आहे. सगळ्या नियमांचे पालन करून आम्ही स्वतःलाच एका चौकटीत ठेवले, कारण इंडस्ट्रीविषयी काही तयार करताना त्यात सहभाग घेणे आणि त्याचा सन्मान करणे खूप गरजेचे आहे.
सिरीज बनवताना आर्यन खानने कोणत्या गोष्टीचा विचार केला
आर्यन ह्युमर आणि कॉमेडीवर बोलला, "कॉमेडीमध्ये कायम गरजेची गोष्ट म्हणजे स्वतःवर केलेल्या कॉमेडीवर हसलेलं सहन करणे. माणूस स्वतः हसला तरच तो प्रेम करेल. सेटवरती या कॉमेडीसाठी सगळे सहभागी व्हायचे आणि आम्ही कोणाचा अपमान होणार नाही याचीही काळजी घेतली. स्क्रीनसाठी काही सीन आम्ही वाढवून दाखवले आहेत, पण काही सीन हे वास्तव जीवनाशी प्रेरित आहेत. ही कोणतीही डॉक्युमेंट्री नाही." यावरून समजले की, आर्यन खानने ही सिरीज पूर्णतः काल्पनिक केली आहे.
ऑफिसर समीर वानखेडेंनी यावर आक्षेप घेतला होता. ते म्हणाले होते की, यात माझा चुकीचा चेहरा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. हे चुकीचं दाखवले आहे. समीर वानखेडेंनी त्यांच्यावर मानहानीची केस टाकली आहे आणि 2 करोड मागितले, जेणेकरून ते पैसे कॅन्सर हॉस्पिटलला दान करता येतील. कोर्टने शाहरुख आणि त्याच्या पत्नीला समन्स पाठवले आहेत. यावर पुढील सुनावणी 30 ऑक्टोबरला होणार आहे.