हॉस्पिटलमध्ये भरण्याच्या पैशांपासून सुरू झाली. अनिशने ते पैसे न भरल्याचं तुषारला कळताच तो थेट घरात पोहोचतो. अखेर तुषार अनिशविरुद्ध पोलिसांत तक्रार नोंदवतो. यावेळेस देखील अनिशला इन्वेस्टमेंटचे काही पैसे मिळाल्यामुळे तो आणखी अहंकारी होतो. मामांचा त्याच्यावर संशय वाढतो आणि त्यांच्यात मोठा वाद होतो.
advertisement
अनिशला फसवणुकीच्या प्रकरणात अटक होण्याची वेळ येते. पण पुन्हाएकदा अशोक मामा पुढे येतात. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं पाहून अशोक मा.मा. सर्व आरोप स्वतःवर घेतात. या घटनेने घरात मोठी खळबळ माजते. आणि पोलिस मामांना अटक करतात.
आता हा गुंता कसा सुटणार ? पुढे मालिकेत काय घडणार ? हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. एकीकडे अनिश मात्र या सगळ्यामुळे अधिकच बिथरतो. दुसरीकडे ऑफिसमध्ये खरा गुन्हेगार सापडणार का ? आणि भैरवीला पुन्हा कामावर बोलवणार का? आणि भैरवी नोकरीवर पुन्हा जाणार ? की बिझनेसकडे लक्ष देण्याचा निर्णय घेणार? हे बघणे उत्सुत्केचे असणार आहे.
वर्षा वेणूची एक जुनी खंतही व्यक्त करते. अशोक मामा आणि त्यांच्या बहिणीमध्ये झालेला वाद मिटावा आणि जाताना एक पत्र व काही कॅश ठेवून जाते. त्या पत्रात ती लिहिते की तिने वेणूकडून काही वर्षांपूर्वी उसने घेतलेले पैसे परत करते. या सर्व प्रसंगांनंतर भैरवी त्यांना आधार देण्याचा प्रयत्न करते. पण अनिश आत्मविश्वास गमावून बसतो आणि देव-देव करण्यात गुंतून जातो, ज्यामुळे त्याचं आणि भैरवीचं नातं आणखी ताणतणावाचं होतं.
पण या सगळ्यात अनिशच्या फसवणुकीचा पर्दाफाश होणार का ? भैरवीच्या बिझनेसवर त्याचा काही परिणाम होणार का ? आणि त्यामुळे घराला आलेलं संकट अजूनच गडद होणार का? यासाठी अशोक मा.मा. ही मालिका पाहावी लागणार आहे.