पोलिसांनी डिकॉय ऑपरेशन राबवलं, फिल्मी स्टाइलनं पकडलं
गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी दोन बनावट ग्राहक (डिकॉय) तयार केले. आरोपींनी या ग्राहकांना मुंबई-अहमदाबाद महामार्गाजवळील काशिमीरा येथील एका मॉलमध्ये बोलावले. पैसे घेण्याच्या क्षणी पोलिसांनी सापळा रचून आरोपींना रंगेहाथ पकडलं आणि ताब्यात घेतलं.
( आधी कमल हासनसोबत केलं काम, नंतर त्यालाच आपल्या इशाऱ्यावर नाचवलं; हा मुलगा कोण! )
advertisement
दोन महिला कलाकारांची सुटका
मीरा-भाईंदर, वसई-विरार विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त मदन बल्लाळ यांनी सांगितले की, सुटका करण्यात आलेल्या दोन्ही महिला कलाकारांनी टीव्ही मालिका आणि बंगाली चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्यांना आश्रयगृहात पाठवण्यात आलं असून पुढील तपास सुरू आहे.
अभिनेत्रीविरोधात गुन्हा दाखल
अनुष्का मोनी मोहन दास असं अटक करण्यात आलेल्या अभिनेत्रीचं नाव आहे. ती 41 वर्षांची आहे. तिच्यावर भारतीय दंड संहितेचे कलम 370 (3) (मानवी तस्करीशी संबंधित) आणि पिटा कायद्यांतर्गत (अनैतिक वाहतूक प्रतिबंध कायदा) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या रॅकेटमागील इतर दलाल आणि नेटवर्कचा शोध घेत आहेत.
हाय-प्रोफाइल ग्राहकांसाठी रॅकेट
पोलिसांच्या माहितीनुसार, हे रॅकेट खास हाय-प्रोफाइल ग्राहकांसाठी चालवलं जात होतं. अभिनेत्री अनुष्का मोनी मोहन दास या प्रकरणात मध्यस्थीची भूमिका बजावत होती. तिला न्यायालयात हजर करण्यात आले असून सध्या ती न्यायालयीन कोठडीत आहे.