बिग बॉसच्या अपकमिंग एपिसोडमध्ये अंकिता आणि विक्की पुन्हा एकदा भांडताना दिसणार आहे. हे भांडणं जेवण बनवण्यावरून सुरू होणार आहे. एक प्रोमो समोर आला आहे ज्यात अंकिता किचनमध्ये जेवण बनवत आहे. पण तिथे असलेले काही जण तिला जेवण बनवण्यावरून टोकतात. हळद जास्त टाक, ओवा टाक असं म्हणत तिच्या जेवणात व्यत्यय आणत असतात. हे पाहून अंकिता चिडते आणि 'तुम्ही बनवा' असं म्हणते.
advertisement
हेही वाचा - Animal ने रचला नवा विक्रम; दहाव्या दिवशी छप्परतोड कमाई करत पार केला इतक्या कोटींचा टप्पा
अंकिताचा राग पाहून विक्की तिला समजावण्यासाठी जातो. पण अंकिता त्याच्यावर ओरडते आणि म्हणते, 'तुला माझ्या हातचं जेवण जेवायचंच नाहीये'. यावर विक्की म्हणतो, 'तीन वर्षात तू असं बनवलंस तरी काय?' अंकिता म्हणते, 'मी प्रेमाने बनवत होते'. त्यावर विक्की तिला 'याची काही गरज नाही. 100 लोक आपल्याला बघत आहेत. जरा तरी इज्जतीत बोल'. यावर अंकिता म्हणते, 'मी इज्जतीतच बोलतेय.'
अंकिताच्या या बोलण्यावर विक्की तिला 'तू माझ्याशी कधीच इज्जतीत बोलत नाहीस. आजपासून माझ्याशी बोलू नको'. विक्कीबरोबर भांडल्यानंतर अंकिता खूप रडते. अंकिता आणि विक्कीला दररोज अशाप्रकारे भांडताना पाहून त्यांच्या चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.