प्रणितने नात्यापेक्षा गेम निवडला!
अभिषेक बजाजच्या एक्झिटला त्याचा मित्र प्रणित मोरे जबाबदार होता. यावर बोलताना अभिषेकने प्रणितवर नाराजी व्यक्त केली. तो म्हणाला, "जेव्हा समजले की दोन लोक बाहेर जाणार, तेव्हा हे नक्की होते की माझ्या किंवा अशनूरमध्ये कोणीतरी जाईल. मला दुख झाले की, जी भीती होती, तेच झाले. मी पहिल्या दिवसापासून खेळात जीव ओतला होता. मी खूप रिअल होतो. माझ्याबद्दल असे कोणतेही इमोशन नव्हते, जे लोकांना माहीत नव्हते."
advertisement
तो पुढे म्हणाला, मी नेहमीच माझा स्टँड घेतला आहे, मग तो स्वतःसाठी असो किंवा मित्रांसाठी असो. पण मला धोका मिळाला. मी नाती जपली आणि प्रणित गेम खेळून गेला. त्याने त्याचा निर्णय घेतला. त्याला कळलं होतं की मी एक मजबूत खेळाडू सिद्ध होत आहे. कुठे ना कुठे लोक स्पर्धात्मक होतात. काही हरकत नाही, मी जर त्याच्या जागी असतो तर मी अशनूरला बाहेर काढले असते, कारण मी नेहमी त्याला माझी प्रायोरिटी म्हटलं आहे आणि मी जे बोलतो ते करतो,"
कुनिकावर साधला निशाणा
घरातील स्पर्धकांबद्दल बोलताना अभिषेकने फरहानाचे समर्थन केले आणि कुनिका यांच्यावर टीका केली. तो म्हणाला, "फरहाना तोंडावर बोलते. ती कधीकधी चुकीचे बोलते, पण ती 'फ्रंट'वर बोलते, तुम्ही तिला बोलू शकता. पण, कुनिका जीसारखे लोक मागे खूप वाईट बोलतात, त्यांना कोणी कॉल आउट का करत नाही? फरहाना तर त्यांच्या अर्ध्या वयाची आहे, ती चुकली तर तिला शिकवता येते, पण कुनिका जी तर आजीच्या वयाच्या आहेत, त्या चुकल्या तर कोण ऐकणार?"
शो कोण जिंकेल, या प्रश्नावर अभिषेकने सर्व स्पर्धकांवर शेरा मारला. अभिषेक म्हणाला, "मी जिंकण्यासाठी खेळत होतो, पण आता मला विजेती फक्त अशनूर दिसते."
इतरांवर टीका करत त्याने गौरव खन्नाला 'बॅकफुट', प्रणितला 'स्मार्ट अँड वीक', तान्या मित्तलला 'ड्रामा', अमलला 'बॅड माऊथ', मालतीला 'विकेट', शहबाजला 'बिलो द बेल्ट', मृदुलला 'ट्यूबलाइट', नीलमला 'नो इंडिव्हिज्युअलिटी', आणि नेहलला 'निगेटिव्ह' म्हटले आहे. अभिषेकच्या या स्पष्ट बोलण्यामुळे त्याला घराबाहेर काढल्याचे खूप वाईट वाटले आहे, हे समजते.
