'मिड-जर्नी' व्हिडिओ आणि 'एक्झिट'च्या चर्चा
अमाल मलिक हा सध्या शोमध्ये असला तरी, तो आरोग्याच्या कारणास्तव काही दिवसांसाठी घराबाहेर येऊ शकतो, असा दावा केला जात आहे. विशेष म्हणजे, नुकताच चॅनलने अमाल मलिकचा एक मिड-जर्नी व्हिडिओ प्रदर्शित केला आहे, जो सहसा सिझनच्या शेवटच्या टप्प्यात स्पर्धकांचा प्रवास दाखवण्यासाठी रिलीज केला जातो.
TMKOC फेम अभिनेत्यावर कोसळला दुःखाचा डोंगर, हृदयद्रावक पोस्ट शेअर करत म्हणाला 'पुन्हा कधीही...'
advertisement
यामुळेच, अमाल मलिक येत्या आठवड्यात काही दिवसांसाठी शोमधून बाहेर जाईल आणि नंतर सीक्रेट रूममधून पुन्हा एन्ट्री करेल, अशी जोरदार शक्यता बांधली जात आहे. पूर्वी सिद्धार्थ शुक्लाच्या बाबतीतही असे घडले होते, त्यामुळे चाहत्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. मात्र, अद्याप याची कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.
वडिलांनी दिला '२८ ऑक्टोबर'चा इशारा
या सगळ्या चर्चांदरम्यान, डब्बू मलिक यांनी 'X' वर एक पोस्ट शेअर केली, ज्यामुळे या चर्चांना बळ मिळाले. त्यांनी लिहिले, "बहुत हो गया... अब बस... मिलते हैं २८ अक्टूबर को। संगीत ही हमारी असली मंजिल है।" या पोस्टमध्ये डब्बू मलिक यांनी थेट अमालचे नाव घेतले नसले तरी, चाहत्यांनी लगेच अंदाज बांधला की, अमाल शोमधून बाहेर येत आहे का? अनेक चाहत्यांनी कमेंट्समध्ये थेट प्रश्न विचारला आहे की, "अमाल खरंच बिग बॉस सोडतोय का?" यावर डब्बू मलिक यांनी मौन बाळगले आहे.
अमालवर टीकांचा भडिमार
अमाल मलिक या शोमध्ये आपली प्रतिमा सुधारण्यासाठी आला होता, पण गेल्या दोन महिन्यांत त्याचे अनेक वाद झाले आहेत. त्याचे मित्र झिशान कादरी जेव्हा बाहेर पडले, तेव्हा त्यांनी मुलाखतीत अमालने धोका दिल्याचा दावा केला होता.
इतकेच नाही तर, एका स्पर्धक फरहाना भट्टबद्दल आक्षेपार्ह बोलल्यामुळे सलमान खान यांनी त्याला फटकारले होते, ज्यामुळे डब्बू मलिक यांना शोमध्ये येऊन त्याला समजावून सांगावे लागले होते. एक्झिटची बातमी खरी ठरल्यास, अमालच्या चाहत्यांसाठी हा मोठा धक्का असेल.
