कबुतर घेऊन आलं 'प्रेमाची चिठ्ठी'
'बिग बॉस'च्या अधिकृत सोशल मीडिया पेजवरून शेअर करण्यात आलेल्या प्रोमोमध्ये घरातील भावनिक क्षण दाखवण्यात आला आहे. एक मोठे कबुतर घरात प्रवेश करते आणि ते सर्व स्पर्धकांसाठी त्यांच्या कुटुंबाची पत्रे घेऊन येते. 'चिठ्ठी आयी है आयी है...' हे गाणं सुरू होताच घरातील वातावरण पूर्णपणे बदलून जाते आणि प्रत्येकजण आपले पत्र उचलायला सुरुवात करतो. ही पत्र वाचताना यंदाची दिवाळी कुटुंबासोबत नव्हे, तर 'बिग बॉस'च्या घरात साजरी करावी लागणार आहे, या विचाराने सर्व स्पर्धक रडत होते.
advertisement
सर्वांना हसवणाऱ्या प्रणित मोरेच्या डोळ्यात अश्रू
घरात सतत मजामस्ती करणारा आणि सर्वांना हसवणाऱ्या प्रणित मोरे आपल्या कुटुंबाचे पत्र वाचताना स्वतःला सावरू शकला नाही. त्याच्या कुटुंबीयांनी लिहिलेल्या पत्रातील शब्द हृदयाला भिडणारे होते. प्रणितसाठी आलेल्या पत्रात लिहिलेले होते की, "प्रिय प्रणित, एकही दिवस असा गेला नाही, जेव्हा आम्हाला तुझी आठवण आली नाही. यंदाची दिवाळी मात्र आम्हाला तुझ्याशिवाय थोडी अपूर्ण वाटते आहे." कुटुंबियांचे हे प्रेमळ शब्द ऐकून प्रणितच्या डोळ्यांतून अश्रूंचा बांध फुटला आणि तो ढसाढसा रडू लागला. हा क्षण पाहून घरातील इतर सदस्यांनाही त्यांचे अश्रू रोखणे कठीण झाले होते.
घरातील इतर सदस्यांनाही अश्रू रोखणे कठीण
प्रणितसोबतच अन्य स्पर्धकांनाही त्यांच्या कुटुंबियांचे प्रेमळ संदेश मिळाले. स्पर्धक मृदूल तिवारीला त्याच्या भावंडांनी पत्र लिहिले होते. तर कुनिका सदानंद यांना त्यांच्या मुलाचे पत्र आले होते. सर्व स्पर्धक आपापली पत्रे वाचताना किंवा ऐकताना रडत होते. या भावनिक टास्कमुळे 'बिग बॉस'च्या घरात रोज होणारे वाद विसरून, स्पर्धकांनी एकत्र येऊन कुटुंबाच्या आठवणीत काही क्षण शांतपणे घालवले.
