TRENDING:

सलमानची अनुपस्थिती अन् Bigg Boss 19 मध्ये डबल एव्हिक्शन! दोघांना काढलं घराबाहेर

Last Updated:

Bigg Boss 19 : 'बिग बॉस 19'मध्ये मागील आठवड्यात नगमा मिराजकर आणि नतालिया जानोसजेक यांना सर्वात कमी वोट्स मिळाल्याने त्यांना घराचा निरोप घ्यावा लागला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Bigg Boss 19 : 'बिग बॉस 19'चा यंदाचा आठवडा स्पर्धकांसह प्रेक्षकांसाठी खूप खास होता. नव्या होस्टसह अनेक अप्रत्याशित ट्विस्टने भरलेला यंदाचा वीकेंड होता. सलमान खानच्या अनुपस्थितीत फराह खानने होस्टची धुरा सांभाळली. भाईजानप्रमाणे फराह सदस्यांची शाळा घेताना दिसून आली. 'बिग बॉस 19'चं नवं पर्व नुकतच सुरू झालं असून अवघ्या तीन आठवड्यांतचं दोन सदस्यांना घराचा निरोप घ्यावा लागला आहे. या वीकेंडच्या वारी फराहने घोषणा केली होती की या आठवड्यात डबल एविक्शन होणार आहे. 'बिग बॉस 19'च्या घरातून बाहेर पडणारे पहिले सदस्य पोलिश फेम अभिनेत्री नतालिया जानोसजेक आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर नगमा मिराजकर आहेत. नतालियाला 'बिग बॉस'चा खेळ कळलाच नाही. तर नगमा 'बिग बॉस 19'च्या घरात अॅक्टिव्ह राहण्यात कमी पडली.
News18
News18
advertisement

'बिग बॉस 19'च्या पर्वातून या आठवड्यात चार सदस्य घराबाहेर पडण्याच्या प्रक्रियेपासून नॉमिनेट झाले होते. नगमा मिराजकर, आवेज दरबार, नतालिया जानोसजेक आणि मृदुल तिवारी हे चार सदस्य डेंजर झोनमध्ये होते. यातून नगमा मिराजकर आणि नतालिया जानोसजेक यांना कार्यक्रमातून निरोप घ्यावा लागला आहे. 'बिग बॉस 19'च्या घरात नतालिया इतर सदस्यांसमोर मात्र दबलेली पाहायला मिळाली. नतालिया आणि मृदुल तिवारीचं नातं मात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं. साल्सापासून ते वेगवेगळ्या भाषा शिकण्यापर्यंत अनेक गोष्टी नतालिया आणि मृदुल एकमेकिंकडून शिकल्या.

advertisement

Dashavatar Collection : 'दशावतार'ने विकेंड गाजवला, केली दुप्पट कमाई; रविवारी मोडले रेकॉर्ड

'बिग बॉस 19'मध्ये दोन नव्या सदस्यांची एन्ट्री

नगमा मिराजकर आणि नतालिया जानोसजेक 'बिग बॉस 19'मधून बाहेर पडल्याने आता घरात दोन नव्या सदस्यांची एन्ट्री होऊ शकते. 'बिग बॉस 19' हा कार्यक्रम प्रेक्षक दर सोमवार ते रविवार रात्री 9 वाजता JioHotstar वर आणि रात्री 10:30 वाजता कलर्स टीव्हीवर पाहू शकता. इंडिया फोरम्सच्या मते,'बिग बॉस 19'च्या घरात जाणारे पहिले वाइल्ड कार्ड सदस्य शिखा मल्होत्रा आणि टिया कर असल्याचं म्हटलं जात आहे. टिया कर एक लोकप्रिय गायिका आहे. आजवर अनेक लोकप्रिय गाणी तिने दिली आहेत. टियाच्या येण्याने बिग बॉसच्या घरात मस्ती आणि संगीतमय वातावरण निर्माण होईल, अशी आशा आहे. पण घरातील सदस्यांसाठी मात्र तिचं अशाप्रकारे प्रेक्षकांचं मनोरंजन करणं अडचणीचं ठरू शकतं. दुसरीकडे शिखा मल्होत्रा अभिनेत्री आहे. सरळ स्वभावाची, आपल्या मताशी ठाम राहणारी शिखा 'बिग बॉस 19'चा खेळ उत्तमरित्या खेळू शकते. शिखाच्या येण्याने 'बिग बॉस 19'च्या घरात सत्य आणि प्रामाणिकपणाचा एक नवा रंग दिसू शकतो.

advertisement

मराठी बातम्या/मनोरंजन/
सलमानची अनुपस्थिती अन् Bigg Boss 19 मध्ये डबल एव्हिक्शन! दोघांना काढलं घराबाहेर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल