बिग बॉस मराठी 5 चे सुपर 6 निक्की तांबोळी, सूरज चव्हाण, अभिजीत सावंत, अंकिता वालवणकर, धनंजय पोवार, जान्हवी किल्लेकर बनले आहेत. आज ग्रँड फिनालेमध्ये या सुपर 6 चा डान्सचा जलवा पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आज प्रेक्षकांना भरभरून मनोंजनाची मेजवानी मिळणार आहे.
सुरज चव्हाण की अभिजीत सावंत, कोण ठरणार बिग बॉस मराठी 5 चा विजेता? पुणेकर म्हणतात…
advertisement
जान्हवी आणि निक्कीच्या सेन्सेशनल परफॉर्मन्सने 'बिग बॉस मराठी'च्या मंचावर चांगलीच रंगत येणार आहे. 'बिग बॉस मराठी'च्या घरातील धाकड गर्ल म्हणून जान्हवी आणि निक्कीकडे पाहिले जाते. त्यामुळे आज ग्रँड फिनालेलाही त्या धाकड जलवा दाखवताना दिसून येतील.
'बिग बॉस मराठी'च्या इतिहासात ब्लॉकबस्टर ठरलेल्या पाचव्या सीझनच्या ट्रॉफीवर कोण नाव कोरणार हे जाणून घेण्यासाठी सर्वजण आतुर आहेत. या भव्यदिव्य ग्रँड सोहळ्याकडे सर्वांच्याच नजरा लागल्या आहेत. 'बिग बॉस मराठी'च्या ग्रँड फिनालेला आज (6 ऑक्टोबर) सायंकाळी 6 वाजल्यापासून सुरुवात होणार आहे. प्रेक्षकांना हा शो 'कलर्स मराठी' वाहिनीवर आणि 'जिओ सिनेमा'वर विनामूल्य पाहता येईल.