फिल्मी कुटूंबासोबत नाते
अभिनेता शाहरुखचा 'बादशाह' नावाचा चित्रपट आला होता. चित्रपटातील बादशाहची मुलगी म्हणजेच छोटी सोनू सगळ्यांनाच आठवते. या सोनूने त्यातील गुंडांना खूपच सळो की पळो करुन सोडले होते. ती बालकलाकार होती करिश्मा जैन छज्जर. जी फिल्म प्रोड्यूसर गिरीश जैन यांची मुलगी होती, तर रतन जैन यांची ती भाची होती. तिचे हे नाते या फिल्मी कुटुंबासोबत होते. करिश्मा सोशल मीडियावर सक्रिय असते. ती आपले फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
advertisement
शाहरुखच्या चित्रपटाने रचला इतिहास, रिलीजआधीच केला हा रेकॉर्ड, बजेट ऐकून व्हाल शॉक
बादशाह चित्रपट 1999 मध्ये आला होता. या चित्रपटाला जास्त काही बॉक्स ऑफिसवर गल्ला जमवता आला नाही. पण हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस पडला होता. या चित्रपटात शाहरुखने बादशाह नावाच्या गुप्तहेराची भूमिका केली होती. त्यात एक सीन होता की एका लहान मुलीचे अपहरण होते. तिला वाचण्यासाठी सीएमला तो मारण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा तो एका मुलीसोबत बिल्डींगवरुन उडी मारतो.
असा मिळाला होता करिश्माला चित्रपट
करिश्मा एका मुलाखतीमध्ये म्हणाली, "मला एका डान्स साठी उभं केलं होतं. त्यावेळी मला फिल्ममेकर अब्बास मस्तान यांनी पाहिले. तेव्हा मला माझा पहिला आणि शेवटचा चित्रपट मिळाला. शूटींगच्यावेळी शाहरुख अब्बासला म्हणाला, 'बेबी जास्त वजनाची आहे.' त्यानंतर त्याने सीन बदलला आणि माझा हाथ पकडून पळायचा सीन केला."
