'द सुवीर सरन शो'मध्ये बोलताना ओरीने आपल्या लोकप्रियतेचा प्रवास मोकळेपणाने शेअर केला. "2023 च्या सुरुवातीला मी खरंच जाड होतो. माझं वजन 70 किलोच्या पुढे गेलं होतं. त्या वेळेस मी ठरवलं की मला फेमस व्हायचं आहे. पण जाड मुलं फेमस होत नाहीत हे माझ्या लक्षात आलं. कोणालाच 5 फूट उंचीचा, जाड मुलगा टीव्हीवर पाहायचा नसतो," असं त्याने सांगितलं.
advertisement
'अरुधंती' झाली आणखीनच ग्लॅमरस, मधुराणी गोखले प्रभुलकरचे बेडवरील हॉट फोटो व्हायरल
या टप्प्यावर त्याने स्वतःवर कठोर निर्बंध लादले. "मी खरंच उपाशी राहिलो. काही दिवस तर रात्री जेवणानंतर उलटी करत टॉयलेटमध्येच झोपून गेलो. पण त्याचा परिणाम झाला. माझं वजन कमी झालं," असं तो स्पष्टपणे सांगतो. तो पुढे हसत हसत म्हणाला, "हो, हे टेक्निकली चीटिंग आहे… पण मी तेच केलं जे करावं लागलं."
ओरी इथेच थांबला नाही, तर तो अगदी ठामपणे म्हणाला की "मी लाइफमध्ये चीटिंगला सपोर्ट करतो, गेममध्ये नाही – कारण तेव्हा जिंकणं खोटं वाटतं. पण आयुष्यात? नक्कीच! तुम्ही ओझेम्पिक वापरत असाल, बॉडीबिल्डिंगसाठी स्टेरॉइड घेत असाल, किंवा एकापेक्षा जास्त लोकांवर प्रेम करत असाल – मी त्यालाही सपोर्ट करतो."
त्याच्या या मोकळ्या आणि स्पष्ट विचारांनी अनेकांच्या भुवया उंचावल्या असतील, पण तेवढाच तो ट्रेंडिंगही ठरला. ओरी म्हणाला की मी फक्त सेल्फीज आणि स्टायलिश आउटफिट्समुळे फेमस झालो असं नाही, तर त्यामागे कठोर मेहनत, संघर्ष, आणि थोडंसं 'वेडेपण'ही आहे.