TRENDING:

Sharad Upadhye on Nilesh sable: 'डोक्यात हवा गेली...' शरद उपाध्येंचा निलेश साबळेवर निशाणा, केली सडकून टीका

Last Updated:

Sharad Upadhye on Nilesh sable: झी मराठीवरील लोकप्रिय विनोदी शो ‘चला हवा येऊ द्या’ पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : झी मराठीवरील लोकप्रिय विनोदी शो ‘चला हवा येऊ द्या’ पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मात्र या नव्या पर्वात काही मोठे बदल असणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून जुने चेहरे वगळ्यात आले आहेत या चर्चांनी सोशल मीडियावर जोर धरला होता. अशातच प्रमुख सूत्रसंचालक डॉ. निलेश साबळे यांचा या टीममधून वगळण्यात आल्याचीही चर्चा सुरू होती, आणि आता त्यांच्या जागी अभिनेता अभिजीत खांडकेकर सूत्रसंचालक म्हणून येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
शरद उपाध्येंचा निलेश साबळेवर निशाणा
शरद उपाध्येंचा निलेश साबळेवर निशाणा
advertisement

या पार्श्वभूमीवर राशीचक्रकार शरद उपाध्ये यांनी एक सडेतोड पोस्ट शेअर केली आहे, जी सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. या पोस्टमध्ये त्यांनी ‘चला हवा येऊ द्या’मध्ये काम करत असताना आलेला अनुभव उघडपणे शेअर केला आहे.

माझं वेगळं स्थान, मी श्रीदेवी किंवा माधुरी दीक्षित नाही; असं का म्हणाल्या वर्षा उसगांवकर?

advertisement

राशीचक्रकार शरद उपाध्ये यांची पोस्ट

"आदरणीय नीलेशजी साबळे, आपल्याला 'हवा येऊ द्या' च्या दुस-या पर्वातून डच्चू देऊन त्या जागी अभिजीत खांडकेकरना आणल्याची बातमी आज पेपरमध्ये वाचली. वाईट वाटले पण आश्चर्य नाही. मला तुम्ही एकदा बोलवले होते. त्याप्रमाणे मी 11 वा.पोहोचलो.पण ३ वाजेपर्यंत त्या रुममध्ये कोणीच फिरकले नाही. मला पाणी हवे होते पण एकादोघांना सांगूनही ते आणतो म्हणून गेले ते आलेच नाहीत. मला रुम सोडू नका असे सांगीतले होते. नीलेश तुम्ही इतर कलावंतांच्या रुम मध्ये जाऊन गप्पा मारीत होतात पण माझ्या रुममध्ये डोकावलात ते थेट 4 वा. स्माईलही न देता स्टेजवर गेलात. इतरांचे शूटिंग खूप वेळ केलेत पण मला 6 वा. बोलावून घाईघाईत 15 मिनिटात सारे आटोपले.त्यावेळीही इतर कलावंत मधेमधे बोलत होते. माझा सारा दिवस फुकट गेला. एडिटींग मध्येही माझी उत्तरे गाळलीत. बाहेर आपली भेट झाली तेंव्हा वडीलांच्या नात्याने काही सल्ले दिले."

advertisement

"पण कार्यक्रमाचे प्रमुख म्हणून आपल्या डोक्यात हवा गेली होती. दुस-याच्या विषयाबद्दल आदर ठेवायचा असतो पण तुम्ही बेपर्वा होतात. त्याच वेळी मला वाटले की अहंकार अति वाईट. गर्विष्ट माणसाचे अध:पतन होते. एखादी पोस्ट मिळाली की ताठा येतो आणि सर्वनाश होतो. स्टेजवर तुम्ही सा-यांना आपलेसे केले नाही. आपले सादरीकरणही आकर्षक होत नव्हते. या सा-याचा परिणाम म्हणजे तुम्हाला चॅनेलने बाहेर काढले. नीलेशजी स्वभाव मनमिळाऊ असावा. सा-यांना सांभाळून घ्यावे मग सारे एकजुटीने काम करून कार्यक्रमाची चर्चा होईल.अभिजीत खांडकेकर ही धुरा चांगली सांभाळतील. मला त्यांचा सहवास मिळाला आहे.आपण अनुभवी आहात. त्यांना मार्गदर्शन करा.इंडस्ट्रीत आपल्याविषयी असलेले गैरसमज आपल्या चांगल्या कामाने दूर करा.आपल्याला ईश्वराची साथ लाभो ही विनंती."

advertisement

नेटकऱ्यांकडून या पोस्टवर संमिश्र प्रतिक्रिया उमटत असून, काहीजण शरद उपाध्येंच्या अनुभवाला दुजोरा देत आहेत, तर काहीजण याला ‘नकारात्मकता’ असे म्हणत बचाव करत आहेत.

मराठी बातम्या/मनोरंजन/
Sharad Upadhye on Nilesh sable: 'डोक्यात हवा गेली...' शरद उपाध्येंचा निलेश साबळेवर निशाणा, केली सडकून टीका
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल