बिग बॉस मराठीच्या घरात सध्या फॅमिली वीक सुरू आहे. त्यामुळे घरातील प्रत्येक स्पर्धकाची फॅमिली येत आहे. धनंजय पोवारची फॅमिली आली तेव्हा त्याने घरच्यांना निक्कीची ज्या प्रकारे ओळख करून दिली ती निक्कीला अजिबात आवडली नाही. धनंजय निक्कीची वडिलांना ओळख करून देताना म्हटला, ''हे वादळ, आमच्या घरातलं.'' निक्कीला याचं वाईट वाटलं.
"मी खरं बोलतोय माझी एंगेजमेंट..."; निक्कीच्या आईनंतर अरबाजने स्वत:च केला खुलासा
advertisement
निक्कीला वाईट वाटल्याचं धनंजयला समजलं तेव्हा त्याने निक्कीची हात जोडून माफी मागितली. समोर आलेल्या प्रोमोमध्ये दिसतंय की, निक्की धनंजयला बोलते, ''तुम्ही माझं दुसरं नाव घेऊन जी ओळख करून दिली ते मला बिलकूल आवडलं नाही.'' मग डीपी दादा म्हणतात, ''त्याच्याबद्दल खरंच सॉरी.'' अंकिता बोलली, ''मला तुला वाईट वाटलं म्हणून मी बोलणार होतो मगाशी तुला. माझं इंटेंशन वाईट नव्हतं. आणि मी पर्सनली तुला सॉरी म्हणायला येणार होतो.'' मी खरंच तुला हात जोडून माफी मागतो. खरंच अंतःकरणापासून मी त्या गोष्टीबद्दल माफी मागतो.
दरम्यान, घरात फॅमिली वीक सुरू असल्यामुळे घरात भावनिक वातावरण झालं आहे. प्रत्येकजण आपल्या कुटुंबाला जवळच्या माणसांना भेटून भावूक झाला. आता बिग बॉसचे अगदी काहीच दिवस उरले आहेत त्यामुळे सगळ्यांचं लक्ष कोण जिंकणार याकडे लागलं आहे.