या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. आतुरतेने प्रेक्षक या सिनेमाची वाट पाहत आहेत. अशातच या चित्रपटाचा टीझर आऊट करण्यात आला आहे.
‘तेरे इश्क में’ ही अशी प्रेमकहाणी आहे जी आनंद एल. राय यांच्या आधीच्या चित्रपटांपेक्षा थोडी वेगळी आहे. या चित्रपटात धनुष ‘शंकर’ नावाच्या पात्रात दिसणार आहेत, जो वायुदलात अधिकारी आहे. त्याच्या भूमिकेकडे पाहता असं वाटतं की, हा चित्रपट देशभक्ती आणि प्रेमाची एक नवी गोष्ट एकत्र मांडणार आहे. तर क्रिती सेनन ‘मुक्ती’ या भूमिकेत झळकणार असून, ती या कथानकाचा दुसरा महत्त्वाचा भाग आहे. या जोडीची केमिस्ट्री सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे, कारण दोन्ही कलाकार त्यांच्या दमदार अभिनयासाठी ओळखले जातात.
advertisement
'जबरदस्ती घेऊन गेले...', झुबीन गर्गच्या बायकोचा खळबळजनक खुलासे, गायकाच्या मृत्यूचं गूढ वाढलं
चित्रपटाचा टीझर रोमँस आणि भावनांनी भरलेला आहे. टीझरच्या सुरुवातीला लग्नाचा माहोल दाखवला आहे. ज्यामध्ये क्रिती सेननचा हळदी समारंभ पार पडताना दिसत आहे. त्या समारंभात सर्वजण नाच-गाणं करत असतात आणि कृतिला हळद लावतात. याच वेळी समोरून धनुष जखमी अवस्थेत चालत येताना दिसतो त्याला पाहून क्रिती आश्चर्यचकित होते.
क्रितीजवळ येत धनुष म्हणतो, "नवीन आयुष्य सुरू करत आहेस, जुने पाप धुऊन टाक." यानंतर तो तिच्या चेहऱ्यावर गंगाजल शिंपडतो. पुढे अरिजीत सिंगच्या आवाजात चित्रपटाच्या टायटल ट्रॅकच्या काही ओळी ऐकू येतात. ‘तेरे इश्क में’ हा चित्रपट 28 नोव्हेंबर रोजी हिंदी आणि तमिळ भाषेत चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.