TRENDING:

रणवीरचा Dhurandhar कोणत्या भारतीय गुप्त मोहिमेवर आधारित? फिल्म पाहिल्यानंतर सत्य जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक

Last Updated:

Dhurandhar Real Story : चित्रपटातील पात्रांचे गंभीर स्वरूप आणि कथेची पार्श्वभूमी पाहता, याचे धागेदोरे काही गंभीर घटनांशी जोडलेले आहेत, हे स्पष्ट होते. चला, तर मग या चित्रपटाच्या कथानकाचे खरे संदर्भ आणि स्त्रोत जाणून घेऊया.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : अलीकडेच प्रदर्शित झालेला 'धुरंधर' हा हिंदी स्पाय ॲक्शन थ्रिलर सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर जोरदार 'धुरळा' उडवत आहे. रणवीर सिंग, अक्षय खन्ना, आर. माधवन आणि संजय दत्त यांसारख्या तगड्या कलाकारांच्या अभिनयामुळे हा सिनेमा खूपच चर्चेत आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन करणारे आदित्य धर 'उरी: द सर्जिकल स्ट्राइक' यांसारख्या यशस्वी चित्रपटांसाठी ओळखले जातात. त्यांच्या पूर्वीच्या कामामुळे, धुरंधर सिनेमा पाहताना अनेकांच्या मनात हा प्रश्न येतो की, याची कथा केवळ काल्पनिक आहे की ती कोणत्या खऱ्या ऐतिहासिक घटनांवर किंवा गुप्त मोहिमांवर आधारित आहे? (Dhurandhar Real Story)
धुरंधर
धुरंधर
advertisement

धुरंदर सिनेमात अनेक ठिकाणी खऱ्या घटनांचे व्हिडीओ क्लिप्स वापरले गेले आहेत, तर काही खऱ्या घटनांचे संदर्भ दिले गेले आहेत. त्यामुळे हा सिनेमा खऱ्या आयुष्याशी कसा जुळतो? किंवा यापैकी प्रत्येक गोष्ट खरी आहे का? नक्की हे काय आणि कसं घडलं? याबद्दल जाणून घेण्यासाठी लोकांमध्ये उत्सुकता आहे आणि लोक सोशल मीडियावर त्याबद्दल सर्च करु लागले आहेत.

advertisement

चित्रपटातील पात्रांचे गंभीर स्वरूप आणि कथेची पार्श्वभूमी पाहता, याचे धागेदोरे काही गंभीर घटनांशी जोडलेले आहेत, हे स्पष्ट होते. चला, तर मग या चित्रपटाच्या कथानकाचे खरे संदर्भ आणि स्त्रोत जाणून घेऊया.

 कहाणीची पार्श्वभूमी

'धुरंधर' चित्रपटाच्या कथेचा आधार भारताच्या इतिहासातील दोन मोठ्या दहशतवादी घटनांभोवती फिरतो 1999 मधील कंदाहार विमान अपहरण (IC-814 Hijack):या घटनेत भारताला दहशतवाद्यांसोमे तडजोड करावी लागली होती. तसेच 2001 मधील भारतीय संसद हल्ला (Parliament Attack या हल्ल्यानंतर भारतीय गुप्तचर यंत्रणेनं शेजारील देशातून होणाऱ्या दहशतवादाला रोखण्यासाठी अधिक कठोर आणि आक्रमक पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला.

advertisement

याच पार्श्वभूमीवर, आर. माधवन यांनी साकारलेले गुप्तचर विभागाचे प्रमुख अजय सान्याल (जे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या भूमिकेवर आधारित असल्याचे मानले जाते) ते एक महत्त्वाकांक्षी गुप्त मिशन तयार करतात, ज्याला 'ऑपरेशन धुरंधर' असे नाव दिले जाते. या मिशनचा उद्देश पाकिस्तानमधील दहशतवादी नेटवर्कला पूर्णपणे संपवणे असतो.

'ऑपरेशन लायरी' आणि कराचीचा अंडरवर्ल्ड

advertisement

'धुरंधर'च्या कथेला सर्वाधिक प्रेरणा मिळाली आहे ती 'ऑपरेशन लायरी' (Operation Lyari) या वास्तविक घटनेतून. लायरी हे कराची, पाकिस्तानमधील एक जुने क्षेत्र आहे, जे एकेकाळी सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध होते, पण नंतर तिथे गँग वॉर, ड्रग्जची तस्करी आणि शस्त्रास्त्रे-धारकांचे मोठे सिंडिकेट तयार झाले.

भारतासह पाकिस्तानी सरकारने देखील 2009 ते 2017 दरम्यान या गुन्हेगारी सिंडिकेट्सचा खात्मा करण्यासाठी अनेक कठोर मोहिमा राबवल्या होत्या, ज्यांना 'ऑपरेशन लायरी' म्हणून ओळखले जाते.

advertisement

'धुरंधर'मध्ये रणवीर सिंगने साकारलेला गुप्तहेर (हामजा अली माझारी) याच लायरीच्या अंडरवर्ल्डमध्ये घुसतो. या भागात स्थानिक गँग्स, राजकारणी आणि आयएसआय (ISI) यांच्यातील गुंतागुंतीचे संबंध दाखवण्यात आले आहेत. चित्रपटातील अनेक मुख्य पात्रे वास्तविक लोकांच्या जीवनापासून प्रेरित असल्याचे बोलले जाते, ज्यामुळे कथेला अधिक वजन प्राप्त होते.

अजय सान्याल म्हणजेच आर. माधवन याने अजित डोवाल यांची भूमीका साराकरी (माजी गुप्तचर अधिकारी आणि विद्यमान राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार)

रहमान डाकैत म्हणजेच अक्षय खन्ना याने सरदार अब्दुल रहमान बलुच याची भूमीका साराकरी (लायरीचा कुख्यात गँग लीडर)

एसपी चौधरी अस्लम म्हणजेच संजय दत्तने चौधरी अस्लम खान याची भूमीका साराकरी (पाकिस्तानचा प्रसिद्ध एन्काउंटर स्पेशालिस्ट, ज्याने लायरी गँग्सविरुद्ध कारवाई केली)

मेजर इक्बाल म्हणजेच अर्जुन रामपालने इल्यास कश्मीरी याची भूमीका साराकरी (कुख्यात दहशतवादी)

हमझा/जसकीरत म्हणजे रणवीर सिंगने कोणत्याही एका व्यक्तीवर आधारित नाही, परंतु मेजर मोहित शर्मा (अशोक चक्र विजेते) यांसारख्या गुप्त मोहिमा राबवणाऱ्या RAW एजंट्स आणि पॅरा-एसएफ कमांडो यांचे संयुक्त रूप असलेली भूमीका साकारली.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीनच्या दरात पुन्हा सुधारणा, कांद्याला आणि मक्याला काय मिळाला आज भाव? Video
सर्व पहा

दिग्दर्शक आदित्य धर यांनी स्पष्ट केले की रणवीर सिंगचे पात्र मेजर मोहित शर्मा यांच्या जीवनावर थेट आधारित नाही, परंतु अनेक गुप्तहेरांच्या कार्याचे मिश्रण या भूमिकेत आहे. त्यामुळे 'धुरंधर' हा चित्रपट वास्तविक घटना आणि पात्रांवर आधारित असला तरी, तो एक अर्ध-काल्पनिक थरारपट आहे. निर्मात्यांनी भूतकाळातील गंभीर दहशतवादी घटनांची पार्श्वभूमी वापरून, कराचीतील लायरी गँग वॉरचा आधार घेऊन भारतीय गुप्तचर यंत्रणांच्या कारवायांची एक काल्पनिक कथा गुंफली आहे.

मराठी बातम्या/मनोरंजन/
रणवीरचा Dhurandhar कोणत्या भारतीय गुप्त मोहिमेवर आधारित? फिल्म पाहिल्यानंतर सत्य जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल