सूरजने शेअर आधी शेअर केलेल्या फोटो आणि व्हिडीओमध्ये मुलीचा फोटो दाखवला नव्हता. नुकताच त्याने एक व्हिडीओ शेअर केला ज्यात त्या मुलीचा चेहरा दिसतोय. व्हिडीओ पाहिल्यानंतर सगळ्यांनी आनंद व्यक्त केला. हिच सूरजची होणारी बायको आहे असं म्हणत सगळ्यांनी त्याला शुभेच्छा दिल्या. मात्र कॅप्शन वाचल्यानंतर सगळ्यांचा हिरमोड झाला.
advertisement
टाईमपास वीडियो आहे माझी खरी लवकरचं दावतो, असं कॅप्शन देत सूरजने हा व्हिडीओ शेअर केला आहे. म्हणजेच सूरज चव्हाणची खरी बायको ही नाही हे यावरून सिद्ध झालं. मग सूरजची बायको आहे तरी कोण असा प्रश्न चाहत्यांना पडला.
अंकिताने देखील सूरजच्या बायकोचा फोटो शेअर केला तेव्हा तिचा चेहरा दाखवला नव्हता. अंकिताने जरी चेहरा दाखवला नसला पण डीपी दादाने मात्र सूरजच्या बायकोचं नावच सांगून टाकलं आहे.
सूरज चव्हाणच्या व्हिडीओवर डीपी दादांनी कमेंट केली आहे. त्यांनी कमेंटमध्ये लिहिलंय, "मला माहित हाय मी बघितलोय
थांब आता तुझा फोटो मीच वायरल करणार. थांब तुझ्या छकुली चा फोटो टाकतो. सूरजच्या होणाऱ्या बायकोचे नाव. छकुली नाव आहे."
आता डीपी दादांनी सूरजच्या होणाऱ्या बायकोचं नाव तर सांगितलं आता होणारी बायको कशी दिसते, ती कोण आहे, काय करते हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. सूरज चव्हाणला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घर बांधून दिलंय ते देखील आता पूर्ण होत आलं आहे. सूरज चव्हाणचं घर आणि होणारी बायको दोन्ही पाहण्यासाठी त्याचे चाहते उत्सुक आहेत.