या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी मैदानात लाखो चाहते उपस्थित होते. बॉबी देओलसोबत अभिनेता निखिल द्विवेदीदेखील यावेळी उपस्थित होते.
‘लव कुश रामलीला’ समितीचे अध्यक्ष अर्जुन कुमार यांनी सांगितलं की, बॉबी देओल हे धार्मिक वृत्तीचे कलाकार आहेत. त्यांनी आपल्या ३० वर्षांच्या फिल्मी करिअरनंतर प्रभू रामचंद्रांच्या शरणेत येण्याचा निर्णय घेतला. समितीच्या निमंत्रणावरून बॉबी देओल या भव्य आयोजनासाठी दिल्लीला आले होते.
advertisement
अक्षय, अजयनंतर आता बॉबीची उपस्थिती!
अर्जुन कुमार यांनी नमूद केलं की, यापूर्वीही अनेक मोठे फिल्मी तारे लव कुश रामलीलाचा भाग बनले आहेत. यात अजय देवगन, करीना कपूर, रोहित शेट्टी, अक्षय कुमार आणि साऊथचा सुपरस्टार प्रभाससह अनेक कलाकारांनी प्रभू रामचंद्रांप्रति आपली श्रद्धा व्यक्त केली आहे.
बॉबी देओलच्या उपस्थितीमुळे या समारंभाची शान आणि लोकांचा सहभाग आणखी वाढला, असं समितीने म्हटलं आहे. रावण दहन ही वाईटावर चांगल्याच्या विजयाची पौराणिक परंपरा आहे आणि बॉबी देओलनेही याचा भाग झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला.