अलीकडेच सूरज बडजात्या यांनी याबद्दल खुलासा केला. ते म्हणाले, “काही विषय असे असतात जे तुम्ही पुढे नेऊ शकत नाही. पात्र तयार होत नाही आणि गोष्ट पूर्ण होत नाही, तर चित्रपट बनवण्यात अर्थ नाही.”
'4 मुलींना गमावलं, बाळाचं प्लॅनिंग केलं पण...; सनी लियोनीचा शॉकिंग खुलासा, IVF च्या वेळी काय घडलं?
advertisement
सूरज यांनी सांगितलं त्यांना सलमानसोबत एक अॅक्शन फिल्म करायची इच्छा होती. पण त्यांना सलमानसाठी योग्य रोल तयार करता आला नाही. म्हणून हा प्लॅन पुढे गेला नाही. सूरज बडजात्या पुढे म्हणाले, "मी आतापर्यंत सात चित्रपट केले आहेत. पण आता ठरवलंय की पूर्ण खात्री झाल्याशिवाय मी चित्रपट करणार नाही. सलमान भाई माझ्यासोबत आहेत हे खूप मोठं आहे. पण त्यांच्या वयानुसार, त्यांच्या प्रतिमेला साजेसं आणि प्रेक्षकांना भावेल असं काहीतरी तयार करणं हे मोठं आव्हान आहे."
1989 साली आलेल्या ‘मैने प्यार किया’ या सूरज बडजात्यांच्या पहिल्या चित्रपटानेच सलमानला स्टारडम मिळवून दिलं. पुढे ‘हम आपके है कौन’ आणि ‘हम साथ साथ हैं’ हे कुटुंबावर आधारित चित्रपट सुपरहिट ठरले. याचमुळे सलमान आणि सूरज ही जोडी प्रेक्षकांच्या मनात कायमची बसली. सलमानबद्दल बोलायचं झालं तर तो नुकताच मार्च 2025 मध्ये आलेल्या ‘सिकंदर’ मध्ये दिसला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर मध्यम कामगिरी करून गेला. आता तो लवकरच ‘बॅटल ऑफ गलवान’ सिनेमात दिसणार आहे. या भूमिकेसाठी तो जोरदार तयारी करत आहे.