फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यातील एक व्हिडीओ मात्र सर्वांचं लक्ष वेधून घेतोय. कारण या व्हिडीओमध्ये शाहरुख खान चक्क एका मराठमोळ्या अभिनेत्रीला किस करत मिठी मारताना दिसतोय. शाहरुख खानसाठी यंदाचा फिल्मफेअर खूप आहे. कारण होस्ट करण्यासह कधी एका अभिनेत्रीला त्याने स्टेजवरुन पडता-पडता वाचवलंय. तर कधी एका अभिनेत्रीला थेट किस केलंय.
advertisement
शाहरुखने कोणाला Kiss केलं?
जगभरात आपल्या नावाचा डंका असणारी मराठमोळी अभिनेत्री छाया कदमला शाहरुखने किस केलं आहे. छाया कदम यांना 'लापता लेडीज' या चित्रपटातील मंजू या भूमिकेसाठी शाहरुख खानच्या हस्ते सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार मिळाल्यानंतर फिल्मफेअरच्या मंचावर शाहरुख खान
छाया कदमला प्रेमाने मिठी मारताना आणि किस करताना दिसला. शाहरुखने मिठी मारताच छाया कदम यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.
Chhaya Kadam : मराठमोळ्या छाया कदमचा बॉलिवूडमध्ये डंका! Filmfare वर कोरलं नाव; म्हणाली,"एका मराठी मुलीला..."
नेमकं काय झालं?
'फिल्मफेअर 2025'मिळाल्यानंतर मंचावर छाया कदम म्हणाल्या,"मला यंदाचा फिल्मफेअर मिळेल असा मी विचारच केला नव्हता. कारण नेहमी कौतुक खूप होत असे पण पुरस्कार धोका द्यायचा. यावेळी मी विचार हाच विचार करुन आले की पुरस्कार मिळो किंवा न मिळो पण छान नटूनथटून जाऊयात. खूप-खूप धन्यवाद. एका मराठी मुलीला यूपीची मंजू बनवल्यावर किरणचे आभार. मला स्वत:वर विश्वास नव्हता की मी या पात्राला न्याय देऊ शकेल. किरणने माझा विश्वास वाढवला. शेवटी एवढचं सांगेल हा पुरस्कार त्यांच्यासाठी आहे जे इंडस्ट्रीत अनेक वर्षांपासून काम करत आहेत आणि मेरा टाईम कब आएगा असा विचार करत आहेत".
छाया ताईंच्या या प्रतिक्रियेवर शाहरुख खान पुढे म्हणतो,"हिशोब बरोबर झाला माझं कौतुक सगळे करतात पण अवॉर्ड कोणी देत नाही, आमचे आशीर्वाद कायम तुमच्यासोबत आहेत". त्यानंतर शाहरुख खान फिल्मफेअरच्या मंचावर छाया ताईंना मिठी मारतो. तसेच सर्वांनी छाया कदमसाठी टाळ्या वाजता असंही किंग खान उपस्थितांना सांगतो. छाया ताई पुढे शाहरुखला म्हणतात माझं आणखी एक स्वप्न पूर्ण झालंय. तुम्ही स्वत: येऊन मिठी मारली. त्यानंतर किंग खान पुन्हा एकदा छाया कदम यांना मिठी मारत प्रेमाने किस करतो.
नितांशी गोयललाही वाचवलं
फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्या नितांशी गोयलला 'लापता लेडीज' चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट महिला पदार्पणाचं पारितोषिक मिळालं. हे पारितोषिक घेण्यासाठी नितांशी जेव्हा स्टेजकडे जाण्यासाठी पुढे सरसावली तेव्हा सुपरस्टार शाहरुख खान त्यांचा हात धरण्यासाठी पुढे आले. नितांशीने जेव्हा स्टेजच्या जिन्यांवर पाऊल ठेवलं तेव्हा तिच्या गाऊनमुळे तिचा तोल गेला. पण लगेचच किंग खानने तिला सावरलं आणि पडण्यापासून वाचवलं. सोशल मीडियावर सध्या नेटकरी शाहरुख खानचं कौतुक करत आहेत. शाहरुख खानला उगाचच 'बॉलीवूडचा सर्वात जेन्टलमन स्टार' म्हटलं जात नाही.