TRENDING:

Final Destinationचा शो अन् 'रिअल हॉरर' एक्सपीरियन्स, चित्रपट पाहताना महिलेसोबत घडलं भयानक

Last Updated:

Final Destination : मुंबईतील थिएटरमध्ये फायनल डेस्टिनेशन पाहताना स्लॅब कोसळून महिलेला दुखापत झाली. महिलेला दुखापत झाली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : फायनल डेस्टिनेशन हा हॉरर, सायको थ्रीलर सिनेमा नुकताच रिलीज झाला आहे. थिएटरमध्ये सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळतोय. सिनेमानं बॉक्स ऑफिसवर देखील धुमाकूळ घातला आहे. पण फायनल डेस्टिनेशन बघायला गेलेल्या एका महिलेसोबत धक्कादायक प्रकार घडला. फायनल डेस्टिनेशन बघत असताना थिएटरमध्ये स्लॅब महिलेच्या अंगावर कोसळला. यात महिलेला दुखापत झाली आहे.
News18
News18
advertisement

अर्जेंटिनामधील फियाम्मा व्हिलाव्हर्डे नावाची एक महिला तिचा 29 वा वाढदिवस साजरा करण्यासाठी फायनल डेस्टिनेशन हा सिनेमा पाहण्यासाठी गेली होती.  La Plata येथील Cinema Ocho या थिएटरमध्ये फायनल डेस्टिनेशन या सिनेमाचा शो सुरू होता.

( एक एक सीन अंगावर काटा आणणारा, अनिता दातेचा भनायक अवतार; 2.8 सेकंदाचा व्हिडीओ पाहा म्हणजे सगळं कळेल )

advertisement

सिनेमा सुरू असताना अचानक थिएटरच्या छताचा काही भाग कोसळला आणि थेट तिच्या अंगावर पडला. या अपघातात तिच्या गुडघ्याला दुखापत झाली. तिला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं आणि सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत.

हा चित्रपटाचा भाग वाटला - फियाम्माची प्रतिक्रिया

Daily Mail शी बोलताना फियाम्माने सांगितलं, "आम्ही फक्त फिरायला बाहेर पडलो होतो. त्या दिवशी तिकिटं स्वस्त होती म्हणून वाटलं चला सिनेमा पाहू." चित्रपटाच्या क्लायमॅक्सदरम्यान मोठा आवाज झाला आणि क्षणभर वाटलं की तो चित्रपटाचा भाग आहे. पण लगेचच छताचा एक मोठा तुकडा तिच्यावर पडला.

advertisement

ही घटना व्हायरल होताच अनेकांनी ब्लॅक कॉमेडी करत कमेंट्स केल्या आहेत. एका युजरनं लिहिलंय, "5D एक्सपिरियन्स फ्री." दुसऱ्यानं कमेंट करत लिहिलंय, "तिने मृत्यूला फसवलं... मृत्यूने टाइमलाइन अपडेट केली."

 Final Destination: Bloodlines चित्रपटाविषयी थोडक्यात

या चित्रपटात टोनी टॉड पुन्हा एकदा विल्यम ब्लडवर्थ या रहस्यमय भूमिकेत परतला आहे. सिनेमाने दिग्दर्शन झॅक लिपोव्स्की आणि अॅडम स्टीन यांनी केलं आहे. तर पटकथा गाय बुसिक आणि लोरी इव्हान्स टेलर यांनी लिहिली आहे.

advertisement

मराठी बातम्या/मनोरंजन/
Final Destinationचा शो अन् 'रिअल हॉरर' एक्सपीरियन्स, चित्रपट पाहताना महिलेसोबत घडलं भयानक
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल