TRENDING:

साऊथमध्ये सिद्धार्थ जाधवचा कडक स्वॅग! विजय सेतुपती आणि अरविंद स्वामींसोबत हटके जुगलबंदी

Last Updated:

Siddharth Jadhav Silent Film: सिद्धार्थने आजवर आपल्या अभिनयाने महाराष्ट्राला वेड लावलंच आहे, पण आता त्याने थेट साऊथच्या दिग्गज सुपरस्टार्ससोबत मैदानात एन्ट्री मारली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: मराठी सिनेसृष्टीचं एनर्जीचं पॉवरहाऊस म्हणजेच सर्वांचा लाडका सिद्धार्थ जाधव. सिद्धार्थने आजवर आपल्या अभिनयाने महाराष्ट्राला वेड लावलंच आहे, पण आता त्याने थेट साऊथच्या दिग्गज सुपरस्टार्ससोबत मैदानात एन्ट्री मारली आहे. निमित्त आहे 'गांधी टॉक्स' या अनोख्या चित्रपटाचं. विशेष म्हणजे, बोलपटांच्या जगात सिद्धार्थ आता एका मुकपटाद्वारे प्रेक्षकांसमोर येणार आहे, जिथे संवाद नसून फक्त डोळ्यांची भाषा आणि अभिनयाची जादू चालणार आहे.
News18
News18
advertisement

साऊथ सुपरस्टार्ससमोर सिद्धूची 'लय भारी' एन्ट्री

'गांधी टॉक्स'मध्ये सिद्धार्थ जाधव एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात साऊथचा मेगास्टार विजय सेतुपती, स्टायलिश व्हिलन अरविंद स्वामी आणि ग्लॅमरस अदिती राव हैदरी यांच्यासारखी मोठी नावं आहेत. साऊथच्या या महागड्या कलाकारांसोबत स्क्रीन शेअर करताना सिद्धार्थने आपला मराठी बाणा आणि अभिनयाची छाप सोडली आहे, याची झलक नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ट्रेलरमध्ये पाहायला मिळाली. संवादांशिवाय फक्त चेहऱ्यावरील हावभावांनी प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याचं आव्हान सिद्धूने लीलया पेललेलं दिसतंय.

advertisement

आधी बॉयफ्रेंडच्या नावाने ढसाढसा रडली, घराबाहेर येताच राधा पाटीलचा यू-टर्न; लिव्ह-इन पार्टनरबद्दल शॉकिंग स्टेटमेंट

मुंबईच्या गल्लीतली गोष्ट

१९३२ मध्ये 'अयोध्येचा राजा' या पहिल्या मराठी बोलपटानंतर चित्रपटसृष्टी बदलली. पण २०२६ मध्ये दिग्दर्शक किशोर पांडुरंग बेलेकर यांनी पुन्हा एकदा मुकपटाचा प्रयोग धाडसाने केला आहे. मुंबईच्या पार्श्वभूमीवर घडणारी ही कथा एका बेरोजगार तरुणाचा संघर्ष, आईसाठी चाललेली धडपड आणि एका बड्या बिझनेसमनचे साम्राज्य यांची गुंफण आहे. यात सिद्धार्थ जाधवची भूमिका कथेला एक वेगळीच उंची देणारी ठरणार आहे. पैशाचा मोह आणि मानवी मूल्ये यांच्यातील हा लढा ३० जानेवारीला मोठ्या पडद्यावर उलगडणार आहे.

advertisement

ए. आर. रहमान यांच्या संगीताची जोड

चित्रपटात संवाद नसल्यामुळे संगीताची जबाबदारी दुपटीने वाढते. ही धुरा चक्क ऑस्करविजेते ए. आर. रहमान यांनी सांभाळली आहे. 'जरा जरा मन खुळावते' यांसारखी गाणी आधीच सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत. विशेष म्हणजे, या मुकपटात सिद्धार्थ जाधवसोबत रोहिणी हट्टंगडी, उषा नाडकर्णी, महेश मांजरेकर यांसारखी मराठीतील मातब्बर फळीही दिसणार आहे.

advertisement

मराठी कलाकारांचा साऊथमध्ये दबदबा

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीन दर पुन्हा वाढले, मका आणि कांद्याची काय स्थिती? इथं चेक करा
सर्व पहा

सिद्धार्थ जाधवचं हे पाऊल फक्त त्याच्यासाठीच नाही, तर संपूर्ण मराठी सिनेसृष्टीसाठी अभिमानास्पद आहे. साऊथच्या सुपरस्टार्ससमोर आपला रुबाब टिकवून ठेवणं हे कठीण काम सिद्धूने सहज केलं आहे.

मराठी बातम्या/मनोरंजन/
साऊथमध्ये सिद्धार्थ जाधवचा कडक स्वॅग! विजय सेतुपती आणि अरविंद स्वामींसोबत हटके जुगलबंदी
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल