गौतमी पाटीलच्या समोर आलेल्या व्हिडिओमध्ये पहायला मिळतंय की, ''ती एक मुलाखत देत आहे. यामध्ये तिला विचारलं जातं की, तुम्हाला राजकारणात यावसं वाटतं का? यावर गौतमी बोलते की, माझं राजकारणात जायचं काही प्लॅनिंग नव्हतं पण काही गोष्टी विचित्र घडल्या. मी दोन चार लावण्यांमध्ये पांढरी टोपी घालून नाचले. सगळ्या डान्समध्ये टोपी सांभाळली, पडू दिली नाही. सगळे म्हणाले एवढी छान टोपी सांभाळणारी आमच्या पाहण्यात नाही. त्यामुळे तू जा राजकारणात.''
advertisement
'फुलवंती'च्या डान्सचं सलग 6 दिवस शुट, प्रवीण तरडे असं काय बोलले ज्यामुळे ढसाढसा रडली प्राजक्ता माळी
पुढे गौतमीला विचारलं जातं की, जर तुम्ही राजकारणात आलात तर कोणत्या पक्षात जाणार? मग यावर गौतमी बोलते, ''मी काय फिक्स करणार, जो मला पक्षात घेईल त्याच्याच पक्षात मी फिक्स.'' गौतमीचा हा व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय.
गौतमीचा हा व्हायरल होत असलेला व्हिडिओ खरंतर तिच्या आगामी सिनेमाचा आहे. गौतमी लवकरच 'मूषक आख्यान' या सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात मकरंद अनासपुरे 9 बहुरंगी भूमिकेत दिसणार आहे. गौतमी आता नव्या सिनेमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झालीय. 8 नोव्हेंबरला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.
गौतमीचा मोठा चाहतावर्ग आहे. गौतमी आता फक्त डान्सरचा नाही तर अभिनेत्री झाली आहे. ती मराठी सिनेमांतून प्रेक्षकांच्या भेटीला आली. नुकतंच तिने 'लाईक्स आणि सबस्क्राइब' सिनेमात आयटम सॉंग केलं. आता तिच्या नव्या भूमिकेसाठी चाहते उत्सुक आहेत.