घुंगरांचा आवाज आणि लपलेला चेहरा
रितेश भाऊंच्या एन्ट्रीने आधीच वातावरण तापलं होतं, पण आता या मिस्ट्री गर्लने सस्पेन्सचा तडका दिला आहे. वाहिनीने शेअर केलेल्या प्रोमोमध्ये एक डान्सर जबरदस्त डान्स करताना दिसतेय. "कातिलों की कातिल येतेय..." असं कॅप्शन दिल्याने नेटकऱ्यांनी आपापल्या तर्कांचे घोडे दौडवायला सुरुवात केली आहे. प्रोमोमध्ये या डान्सरची अदा आणि तिचं सादरीकरण पाहून ती कुणीतरी नावाजलेली कलाकार असल्याचं स्पष्ट होतंय, पण मेकर्सनी तिचा चेहरा मात्र गुलदस्त्यात ठेवला आहे.
advertisement
गौतमी पाटील की राधा मुंबईकर?
प्रोमोमध्ये 'कातिल' हा शब्द वापरला गेल्यावर साहजिकच सर्वांच्या डोळ्यासमोर पहिलं नाव आलं ते म्हणजे महाराष्ट्राची लोकप्रिय डान्सर गौतमी पाटील. अनेकांनी कमेंट बॉक्समध्ये "ही तर गौतमीच!" असा दावा केला आहे. मात्र, काही दिवसांपूर्वीच गौतमीने आपण बिग बॉसमध्ये जाणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं. मग ही दुसरी कोणती 'कातिल' आहे?
दुसरीकडे, राधा मुंबईकर या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून मीडियामध्ये ज्या संभाव्य स्पर्धकांची यादी फिरत आहे, त्यात राधाचं नाव आघाडीवर होतं. त्यामुळे ही 'कातिल' अदाकारी राधा मुंबईकरचीच असण्याची शक्यता दाट आहे. राधाच्या लावणीचे आणि डान्सचे व्हिडिओ सोशल मीडियावर आधीच गाजत आहेत, त्यामुळे ती बिग बॉसच्या घरात आली तर राडा होणार हे नक्की!
