BBM6 मध्ये दिसणार प्रसिद्ध सोशल मिडिया इन्फ्लूएन्सर, नव्या प्रोमोमध्ये दिसली पहिली झलक, तुम्ही पाहिला का VIDEO?

Last Updated:

Bigg Boss Marathi 6 Confirm Contestant: कलर्स मराठीने नुकताच एका नवीन स्पर्धकाचा प्रोमो शेअर केलाय आणि तो पाहून चाहत्यांनी एकच जल्लोष सुरू केला आहे.

News18
News18
मुंबई: तुमच्या-आमच्या मोबाईल स्क्रीनवर आपल्या मिश्किल विनोदांनी आणि 'अतरंगी' व्हिडिओंनी हसवणारा आपला लाडका करण सोनवणे आता थेट बिग बॉसच्या घरात जाणार आहे! गेल्या काही दिवसांपासून 'बिग बॉस मराठी ६' च्या स्पर्धकांबाबत ज्या चर्चांना उधाण आलं होतं, त्यावर आता जवळपास शिक्कामोर्तब झालंय. कलर्स मराठीने नुकताच एका नवीन स्पर्धकाचा प्रोमो शेअर केलाय आणि तो पाहून चाहत्यांनी एकच जल्लोष सुरू केला आहे.
प्रोमोमधील हा चेहरा दुसरा कोणी नसून सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर करण सोनावणे असल्याचं कळतंय. खरं तर, करणने दोन दिवसांपूर्वीच त्याच्या चाहत्यांची धाकधूक वाढवली होती. त्याने एक सूचक इन्स्टाग्राम स्टोरी शेअर करत लिहिलं होतं, "२०२६ हे वर्ष खूपच वाईल्ड असणार आहे. पहिल्या सहा महिन्यातच मी तुम्हाला एका भन्नाट प्रवासावर घेऊन जाणार आहे." आता बिग बॉसच्या घरापेक्षा वाईल्ड आणि भन्नाट प्रवास दुसरा कोणता असू शकतो? या गूढ पोस्टनेच निम्मी खात्री पटवली होती, पण आता प्रोमोने त्यावर अधिकृत मोहोर उमटवली आहे असं म्हणायला हरकत नाही.
advertisement
advertisement
प्रोमोमध्ये स्पर्धकाचा चेहरा स्पष्ट दिसत नसला तरी, त्याची देहबोली, चालण्याची ढब आणि तो मराठमोळा स्वॅग पाहून 'फोकस्ड इंडियन'च्या चाहत्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडलाय.
करण सोनवणे हा त्याच्या आगळ्यावेगळ्या कंटेंटसाठी ओळखला जातो. मध्यमवर्गीय कुटुंबातील छोटी-छोटी सुखं-दुःखं विनोदी अंगाने मांडण्यात त्याचा हातखंडा आहे. पण बिग बॉसचं घर हे केवळ हसण्या-खिदळण्याचं ठिकाण नाही; तिथे संयम, राजकारण आणि टास्क पूर्ण करण्यासाठी स्पर्धकांचा कस लागतो. रिल्समध्ये सर्वांना आपल्या तालावर नाचवणारा करण, रितेश भाऊच्या धक्क्याला कसा सामोरा जातो आणि घरातील इतर स्पर्धकांसोबत त्याचा गेम कसा राहतो, हे पाहणं खरोखरच रंजक ठरेल.
advertisement

११ जानेवारीला होणार धमाका

रितेश देशमुख दुसऱ्यांदा 'बिग बॉस'चं सूत्रसंचालन करत असून, यंदाचं पर्व खूपच वेगळं आणि आव्हानात्मक असणार आहे. रविवार, ११ जानेवारी २०२६ रोजी रात्री ८ वाजता कलर्स मराठीवर या शोचा ग्रँड प्रीमियर पार पडेल. या सोहळ्यात करणची अधिकृत एन्ट्री कशी होते आणि तो मंचावर रितेश भाऊंसोबत काय धिंगाणा घालतो, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
BBM6 मध्ये दिसणार प्रसिद्ध सोशल मिडिया इन्फ्लूएन्सर, नव्या प्रोमोमध्ये दिसली पहिली झलक, तुम्ही पाहिला का VIDEO?
Next Article
advertisement
Akot News: शिवसेना ते भाजप व्हाया काँग्रेस, एमआयएमसोबत युती करणारे आमदार भारसाखळे आहेत कोण?
शिवसेना ते भाजप व्हाया काँग्रेस, एमआयएमसोबत युती करणारे आमदार भारसाखळे आहेत कोण?
  • भाजप आणि एमआयएम (AIMIM) यांची युती झाल्याने संपूर्ण देशात चर्चा

  • अकोटचे आमदार प्रकाश भारसाखळे यांना 'कारण दाखवा' नोटीस बजावली आहे.

  • भाजपची राजकीय अडचण करणारे प्रकाश भारखळे आहेत कोण, असा प्रश्न काहींना पडला आहे.

View All
advertisement