गणेश चतुर्थीच्या दिवशी गोविंदाच्या घरी गणपती बाप्पांचं आगमन झालं. गोविंदा आणि सुनिता यांनी मनोभावे बाप्पाची पूजा केली. यावेळी दोघेही पारंपरिक लुकमध्ये दिसले. दोघांनीही ट्विनिंग केलं होतं. दोघांचं एकमेकांवरील प्रेम पुन्हा एकदा पाहायला मिळालं.
advertisement
गोविंदाचे मॅनेजर शशि सिन्हा यांनी मीडियाशी बोलताना गणेश चतुर्थीची वाट पाहा. सुनिता आणि गोविंदा एकत्र दिसतील असं सांगितलं होतं. दोघांचा डिवोर्स होणार नाही. शशि सिन्हा यांचे शब्द न शब्द खरे ठरेल. गोविंदा आणि सुनिता हे आजही एकत्र आहेत हे त्यांनी गणेश चतुर्थीच्या दिवशी दाखवून दिलं.
मीडियाशी बोलताना सुनिताने गोविंदा फक्त माझा आहे. आम्हाला कोणीही वेगळं करू शकत नाही असं ठणकावून सांगितलं. डिवोर्सच्या चर्चा अफवा असल्याचं इथे स्पष्ट झालं. गोविंदा आणि सुनिता एकत्र असल्याचं पाहून चाहत्यांनी देखील आनंद व्यक्त केला.
आता गणपती विसर्जनाच्या दिवशी सुनिता आणि गोविंदा पुन्हा एकदा एकत्र मीडियासमोर आले. बँजोवर सुनिता आणि गोविंदा थिरकताना दिसले. डान्स करणं ही सुनिता आणि गोविंदामध्ये कॉमन आणि आवडीची गोष्ट आहे. दोघेही आनंदानं नाचताना दिसले. दोघांचं प्रेम पुन्हा एकदा त्यांच्या चाहत्यांना पाहायला मिळालं.
व्हिडीओमध्ये पाहायला मिळतंय की, गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी गोविंदा पायी गेला. सुनिताचा उत्साह नेहमीप्रमाणे ओसंडून वाहत होता. गोविंदाचा मुलगा यशवर्धनने बाप्पाची पूजा आरती केली. सुनिता आणि गोविंदाचं कुटुंब याक्षणी खूप आनंदात दिसलं.