घटस्फोटाच्या या प्रकरणामुळे सुनीता आहुजा खूपच दुखावली असल्याचे दिसून येत आहे. अलीकडेच एका व्लॉगमध्ये ती महालक्ष्मी मंदिरात गेली होती. लहानपणापासूनच ती या मंदिरात जात असल्याचं सांगताना तिला अश्रू अनावर झाले. ती भावुक होत म्हणाली, "मी गोविंदाला भेटल्यावर देवीला अशी प्रार्थना केली होती की तिने मला गोविंदाशी लग्न करू द्यावं. देवीने माझ्या सर्व इच्छा पूर्ण केल्या आणि मला दोन मुलेही दिली."
advertisement
2 दारुच्या बाटल्या घेऊन मंदिरात गेली गोविंदाची पत्नी; म्हणाली, 'बाबा दारू पिऊन...'
मात्र, तिचा चेहरा आणि शब्द तिच्या मनात असलेली प्रचंड वेदना स्पष्ट करत होते. तिच्या म्हणण्यानुसार, 'सगळं मिळवणं सोपं नसतं, त्यात चढ-उतार असतात. पण माझा मातेवर इतका विश्वास आहे की आज जरी मला काही दिसलं, तरी मला माहित आहे की जो कोणी माझं घर तोडण्याचा प्रयत्न करेल, तो वाचणार नाही.' तिच्या या बोलण्यातून कोणातरी तिसऱ्या व्यक्तीमुळे त्यांच्या नात्यात दुरावा आल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. तिने पुढे इशारा दिला की 'आई काली तिथे बसली आहे' आणि ती तिच्या कुटुंबाला तोडणाऱ्या कोणालाही सोडणार नाही.
काही महिन्यांपूर्वी आलेल्या बातम्यांनुसार, गोविंदाचे एका 30 वर्षीय मराठी अभिनेत्रीसोबतचे अफेअर त्यांच्यातील वाढत्या दुराव्याचे मुख्य कारण मानले जात आहे. गोविंदाची या अभिनेत्रीशी वाढती जवळीक सुनीताला आवडली नाही आणि त्यामुळेच त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. सुनीताने कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला असून ती प्रत्येक सुनावणीला हजर असते. मात्र, गोविंदा सातत्याने अनुपस्थित राहत असल्याने या प्रकरणातील गुंतागुंत वाढत आहे.
यापूर्वी, गोविंदाच्या वकिलाने दोघांनीही पुन्हा एकत्र येण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा केला होता. पण आता सुनीताने घेतलेली कठोर भूमिका पाहता, त्यांचा संसार वाचवण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरल्याचे दिसून येत आहे.
सुनीता आहुजा किंवा गोविंदाने अद्याप या घटस्फोटाची घटला दाखल करण्याविषयी कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.