TRENDING:

Govinda-Sunita Ahuja: 'मी काय बोलू?', गोविंदा-सुनीता आहुजाचा संसार मोडणार? लेकीने सोडलं मौन; सांगितलं सत्य

Last Updated:

Govinda-Sunita Ahuja: बॉलिवूडचा लोकप्रिय हिरो गोविंदा आणि त्यांची पत्नी सुनीता आहुजा हे नेहमीच चर्चेत असतात. कधी त्यांच्या गोड नात्यामुळे, तर कधी कौटुंबिक वादांमुळे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : बॉलिवूडचा लोकप्रिय हिरो गोविंदा आणि त्यांची पत्नी सुनीता आहुजा हे नेहमीच चर्चेत असतात. कधी त्यांच्या गोड नात्यामुळे, तर कधी कौटुंबिक वादांमुळे. काही दिवसांपासून मात्र या जोडप्याबद्दल वेगळ्याच चर्चा सुरू आहेत, “गोविंदा आणि सुनीता घटस्फोट घेणार का?” ही बातमी चाहत्यांसाठी मोठा धक्का होता. घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरलेला असताना आता गोविंदा सुनीताच्या लेकीने यावर प्रतिक्रिया दिली आहे.
गोविंदा-सुनीता आहुजाचा संसार मोडणार?
गोविंदा-सुनीता आहुजाचा संसार मोडणार?
advertisement

काय म्हणाली टीना आहुजा?

गोविंदा आणि सुनीता आहुजाच्या घटस्फोटाच्या चर्चांवर लेक टीना आहुजाने मौन सोडलं आहे. तिने थेट सांगितलं की या सर्व चर्चा निराधार आहेत. हिंदुस्तान टाईम्सशी बोलताना टीनाने म्हटलं, " मी काय बोलू? ही फक्त अफवा आहे. मी अशा बातम्यांकडे लक्ष देत नाही. मला अभिमान आहे की मला इतकं सुंदर कुटुंब लाभलं. मीडिया आणि चाहत्यांकडून मिळणारं प्रेम खूप मोठं आहे, त्याबद्दल मी आभारी आहे."

advertisement

18 वर्षांपासून एकही हिट सिनेमा नाही, मग गोविंदा कुठून करतो एवढी बक्कळ कमाई?

टीनाने आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगितली, "सध्या बाबा देशातही नाहीत. त्यामुळे या चर्चांचा काही आधारच नाही." गोविंदाचे मॅनेजर शशी सिन्हा यांनीही या अफवांचा खुलासा केला. ते म्हणाले, "घटस्फोटाच्या चर्चा या जुन्या घटनांवर आधारित आहेत. सुनीताने 2024 मध्ये वांद्रे कौटुंबिक न्यायालयात एक खटला दाखल केला होता. पण तो खटला आता निकाली निघाला आहे. आज त्यांच्या नात्यात सर्व काही ठीक आहे. काळजी करण्यासारखं काहीच नाही."

advertisement

त्यांनी पुढे हेही सांगितलं की काही लोक जुन्या गोष्टी पुन्हा पुढे आणून त्याला ताज्या बातम्यांचा रंग देतात. "गोविंदाने कधी याबद्दल बोललं का? नाही ना! मग लोकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. आम्ही लवकरच अधिकृत निवेदनही देऊ."

मराठी बातम्या/मनोरंजन/
Govinda-Sunita Ahuja: 'मी काय बोलू?', गोविंदा-सुनीता आहुजाचा संसार मोडणार? लेकीने सोडलं मौन; सांगितलं सत्य
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल