गोविंदा-सुनिता एकत्र
अनेक माध्यमांमध्ये असा दावा करण्यात आला होता की गोविंदा आणि सुनीता आहुजा यांच्यात सर्व काही ठीक चालले नाही. सुनीता यांनी 38 वर्षांच्या लग्नानंतर घटस्फोटाचा खटला दाखल केला आहे. तिने गोविंदावर फसवणूकीचे आरोपही केल्याचा दावा करण्यात आला होता. पण आता बाप्पाच्या पुढ्यात हे कपल पूर्वीसारखंच हसताना आणि आनंदात दिसलं.
advertisement
( गोविंदाने मामाच्या मेहुणीलाच पटवलं, कशी सुरू झालेली Love Story )
गणेश चतुर्थीला गोविंदा आणि सुनीता आहुजा एकत्र आले आहेत आणि त्यांनी सर्व बातम्या खोट्या असल्याचे सिद्ध केले आहे. दोघांनीही बाप्पाचे एकत्र दर्शन घेतले पापाराझींना एकत्र पोझेस दिल्या. त्यांना मिठाई वाटली. दोघांमधील प्रेम पहिल्यासारखंच असल्याचं पाहायला मिळालं.
व्हिडिओ व्हायरल
एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात गोविंदा आणि सुनिताला एकत्र पाहून डिवोर्सवरून पापाराझींनी प्रश्न विचारला. त्यावर सुनिता त्यांना म्हणाली, "तुम्ही लोक कॉन्ट्रोवर्सी ऐकायला आलात की गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला आले आहात." यावर गोविंदा मोठ्याने हसतो. लगेच सुनिता म्हणते, "काही कॉन्ट्रोवर्सी नाही." त्यावर गोविंदा मोठ्यानं 'गणपती बाप्पा मोरया' म्हणतो. यावरून आता दोघांमध्ये कोणताही वाद नसल्याचं पाहायला मिळालं आहे. यावेळी गोविंदा आणि सुनीता आहुजा यांनीही मॅचिंग कपडे परिधान केले होते.
काही दिवसांआधीच गोविंदाचे मॅनेजर शशि सिन्हा यांनी समोर येऊन दोघांमध्ये सगळं काही चांगलं असल्याचा दावा केला होता. गणेश चतुर्थीला सगळ्यांना सगळं काही खरं कळेल असंही त्यांनी म्हटलं होतं. अखेर गणेश चतुर्थीला गोविंदा आणि सुनिताबद्दल मॅनेजरनं सांगितलेला शब्द आणि शब्द खरं ठरला आहे.