ही घटना २५ जुलै २०२५ रोजी पोलंडमधील वारसॉ येथे घडली. जेनिफर लोपेझ तिथे एका कॉन्सर्टमध्ये परफॉर्म करत होती. तिचं गाणं सुरू होतं, चाहते तिच्या तालावर थिरकत होते. जेनिफर आपल्या नेहमीच्याच एनर्जीने गात होती, नाचत होती. पण अचानक, घडलं असं काही की जेनिफर स्वतःही क्षणभर गोंधळली आणि तिथे उपस्थित असलेले चाहतेही थक्क झाले.
advertisement
गाणं सुरू असतानाच जेनिफरचा स्कर्ट निसटला आणि...
गाणं सुरू असतानाच जेनिफरचा स्कर्ट अचानक निसटला आणि सर्वांसमोर खाली पडला. हा क्षण इतका अनपेक्षित होता की, जेनिफर लोपेझच्या चेहऱ्यावरही काही क्षण 'काय घडलं' असा भाव दिसला. पण तिने लगेचच परिस्थिती हाताळली. ती क्षणभरही थांबली नाही, गाणं आणि तिचा परफॉर्मन्स सुरूच ठेवला.
या घटनेचा व्हिडिओ तिथे उपस्थित असलेल्या अनेक चाहत्यांनी शूट केला आणि तो आता सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये जेनिफर लोपेझचा तो उप्स मूमेंट स्पष्ट दिसत आहे. या व्हिडिओमुळे जेनिफर लोपेझ पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनली आहे. अशा घटना कलाकारांच्या लाईव्ह परफॉर्मन्समध्ये क्वचितच घडतात. अनेकदा कलाकार अशा परिस्थितीत गोंधळून जातात, पण जेनिफर लोपेझने ज्या प्रकारे ही परिस्थिती हाताळली, ते कौतुकास्पद आहे.