अभिनेत्री हृता दुर्गुळे आज तिचा 30वा वाढदिवस साजरा करतेय. हृताचं शिक्षण हे माटुंग्याच्या रुईया कॉलेजमध्ये झालंय. कॉलेजमध्ये शिकत असताना इंटर्नशीप म्हणून ती एका मालिकेच्या सेटवर काम करत होती. याच मालिकेच्या सेटवर काम करत असताना हृताला प्रसिद्ध दिग्दर्शकानं पाहिलं आणि तिला 'दुर्वा' ही तिची पहिली वहिली मालिका ऑफर केली. 'दुर्वा' ही मालिका करत असताना हृता चौदावीत शिकत होती. तिचं वय केवळ 18-20 वर्ष इतकं होतं.
advertisement
हेही वाचा - मालिकेच्या शुटिंगदरम्यान मराठमोळ्या अभिनेत्रीला सुरू झाला त्रास अन्..., उपचारादरम्यान झाला होता मृत्यू
एका मुलाखतीत हृतानं तिचा आतापर्यंतचा प्रवास सांगितला. अभिनय क्षेत्रात येण्याचा तिचा योग कसा जुळून आला हे सांगताना ती म्हणाली, "मी अभिनय करेन असं कधी ठरवलं नव्हतं. माझ्या घरी शिस्तीचं वातावरण होत आणि त्यामुळे घरात याआधी कोणीच अभिनय क्षेत्रात नव्हतं. त्यामुळे शिकण्यासाठी आमच्याकडे काही मर्यादित क्षेत्रांचा विचार केला जात होता".
हृता पुढे म्हणाली, "मी रूईया कॉलेजमध्ये ऍडव्हर्टाइसिंग करत होते. तेव्हा इंटर्नशिप म्हणून स्टार प्रवाहवरील 'पुढचं पाऊल' मालिकेसाठी कॉस्च्युम ad म्हणून काम करत होते. माझी इंटर्नशिप काही दिवसांचीच होती. तेव्हा एकदा मला रसिका देवधर यांनी पाहिलं आणि दुर्वा मालिकेबद्दल सांगितलं. तू ऑडिशन दे असा सल्ला मला दिला. पण तेव्हा मला अशी ऑडिशन वगैरे द्यावी असं वाटतं नव्हतं. कारण घरातील वातावरण तसं होतं. त्यामुळे शिक्षणाशिवाय काही विचार केला नव्हता. पण तेव्हा आई बाबांनी जर दुर्वा मालिका करण्यासाठी होकार दिला नसता तर मी या क्षेत्रात आलेच नसते. कधीतरी एखाद्या प्रवासादरम्यान तुम्हाला नेमकं कुठे जायचं याची वाट सापडते तसंच माझं आहे. मी अगदी अपघाताने आणि छंद म्हणून दुर्वा मालिका स्वीकारली. त्यानंतर या क्षेत्रात करिअर करेन असं मला अजिबात वाटलं नव्हतं".