मालिकेच्या शुटिंगदरम्यान मराठमोळ्या अभिनेत्रीला सुरू झाला त्रास अन्..., उपचारादरम्यान झाला होता मृत्यू

Last Updated:

रसिका जोशी यांना कलर्सवरील ‘बंदिनी’ या मालिकेच्या शुटिंगदरम्यान त्रास सुरू झाला. तेंव्हाच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले होते.

रसिका जोशी
रसिका जोशी
मुंबई, 11 सप्टेंबर : प्रपंच' ही मालिका असो, 'खबरदार' हा सिनेमा असो किंवा 'व्हाईट लिली नाईट रायडर'सारखं नाटक… दिवंगत अभिनेत्री रसिका जोशीच्या अभिनयाचं नाणं खणखणीतच वाजायचं. मराठीतल्या या गुणी अभिनेत्रीनं 7 जुलै 2011 रोजी या जगाचा कायमचा निरोप घेतला. कॅन्सरमुळे वयाच्या अवघ्या 39 व्या वर्षी रसिका जोशीचं निधन झाले. मराठीच नव्हे तर हिंदी सिनेसृष्टीतसुद्धा रसिका जोशी हे प्रसिद्ध नाव होतं. हिंदीतील मालामाल विकली, गायब, ढोल, भुलभुलैय्या या कॉमेडी सिनेमांसोबतच एक हसीना थी, वास्तुशास्त्र या गंभीर सिनेमांमधील भूमिकांचे रसिका जोशीनं सोनं केलं.
रसिका जोशीचा जन्म 12 सप्टेंबर 1972 साली झाला होता. रसिकानं मराठी नाटके, दूरचित्रवाणी मालिका व चित्रपटांखेरीज हिंदी दूरचित्रवाणी व चित्रपट माध्यमांतूनही अभिनय केला. दिग्दर्शक गिरीश जोशी यांच्या त्या पत्‍नी होत्या. तिच्या अनेक विनोदी भूमिका गाजल्या.रसिका जोशी यांची मराठीतील कारकिर्द सर्वांच्याच लक्षात राहण्यासारखी आहे. आपल्या बिनधास्त आणि सशक्त अभिनयामुळे प्रेक्षकांना कायमच आपल्या जागेवर खिळवून ठेवायच्या.
advertisement
रसिका जोशी यांचे शिक्षण अ.भि.गोरेगावकर स्कूलमध्ये झाले होते. महाविद्यालयीन शिक्षण घेत असतांनाच आंतरमहाविद्यालयीन नाटयस्पर्धा त्यांनी गाजवल्या होत्या. पहिल्यापासूनच वेगळे काहितरी करण्यासाठी त्यांची धडपड असायची. रंगभूमीपासून सुरू झालेला त्यांचा प्रवास हळुहळू मराठी मालिका, मराठी चित्रपट, हिंदी चित्रपट आणि हिंदी मालिकांपर्यंत पोचला होता. रसिका जोशी यांनी पंडीत सत्यदेव दुबे, विजयाबाई मेहता यांच्या नाटय शिबीरांमध्येही सहभाग घेतला होता.
advertisement
मराठीतील ‘प्रपंच’ या मालिकेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली. त्यआधी त्यांनी ‘नागमंडल’, ‘हलकंफुलकं’, ‘सुपरहिट नं.१’,‘गंमत जंमत’ अशी नाटकेही गाजवली होती. मागील दोन वर्षात त्यांच्या ‘व्हाईट लिली अ‍ॅन्ड नाईट राईडर’ या नाटकाने तर रंगभूमीवर रसिकांची प्रचंड दादा मिळवली होती. या नाटकाला अनेक पुरस्कारही मिळाले. या नाटकाची पटकथा, संवाद लेखनही रसिका जोशी यांनीच केले होते. अभिनयाची उत्तम जाण, रंगभूमीविषयी प्रचंड श्रद्धा यामुळे हिंदी चित्रपटसृष्टीत जाऊनही त्यांनी मराठीशी आपली नाळ तोडली नाही. प्रेक्षकांना आपल्या अभिनयातून आनंद द्यायचा त्यांचा प्रयत्न होता.
advertisement
मराठी चित्रपटातील त्यांच्या भूमिका मराठी प्रेक्षकांना आजही खूप हासवतात. ‘अग्गं बाई अरेच्चा’मधील ‘टॅक्सी ड्रायव्हर’, ‘खबरदार’मधील ‘आई’, ‘आई नं.१’ मधील ‘सुपरवुमन’यांसाख्या त्यांच्या भूमिकांनी प्रेक्षकांच्या मनात स्वत:विषयी वेगळे स्थान निर्माण केले होते.केदार शिंदे यांच्या ‘यंदा कर्तव्य आहे’ या चित्रपटाचे संवाद लेखन त्यांनी केले होते. तसेच ‘प्रपंच’, ‘टिकल ते पॉलिटिकल’, ‘घडलंय बिघडलंय’ सारख्या मराठी मालिकांमधूनही त्यांनी काम केले आहे.
advertisement
हिंदीत राम गोपाल वर्मा यांच्या ‘गायब’ चित्रपटातील त्यांची भूमिका गाजली होती. त्यानंतर, प्रियदर्शन यांच्या ‘मालामाल विकली’, ‘भुलभुलैय्या’ अशा चित्रपटांमधून हिंदी रसिकांनाही आपल्या अभिनयाने खूप हासवले होते. तसेच, त्यांनी ‘वास्तुशास्त्र’, ‘भूत अंकल’, ‘जॉनी गद्दार’, ‘बिल्लू बार्बर’,‘खलबली’ ‘एक हसीना थी’, ‘डरना जरूरी है’ असे चित्रपटही केले होते.
बंदिनी’ या मालिकेच्या शुटिंगदरम्यान त्रास सुरू
उत्कृष्ट विनोदनिर्मितीची जाण, विनोदाचे अचूक टायमिंग आणि विविधांगी भूमिका करणा-या रसिका जोशी यांना कलर्सवरील ‘बंदिनी’ या मालिकेच्या शुटिंगदरम्यान त्रास सुरू झाला. तेंव्हाच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.
मराठी बातम्या/मनोरंजन/
मालिकेच्या शुटिंगदरम्यान मराठमोळ्या अभिनेत्रीला सुरू झाला त्रास अन्..., उपचारादरम्यान झाला होता मृत्यू
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement