'याच अभिनेत्रीने नंतर एका पैसेवाल्या अधिकाऱ्याबरोबर लग्न केले' महेश टिळेकरांचा नेमका रोख कोणाकडे?
- Published by:News18 Trending Desk
- Written by:News18 Marathi
Last Updated:
काही दिवसांपूर्वी आई कुठे काय करते फेम मिलिंद गवळी यांनी महेश टिळेकर यांच्यामुळे माझे मुंबईतील पहिलं घर झाल्याचे म्हणत आभार मानले होते. यानंतर महेश टिळेकर यांनी देखील मिलिंद गवळी यांचे कौतुक केले आहे. शिवाय त्यांनी एका मराठमोळ्या अभिनेत्रीचं नाव न घेता तिची कान टोचणी केली आहे. सध्या त्यांची ही पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे.
मुंबई, 11 सप्टेंबर : मराठीतील अनेक सेलेब्स सध्या नवीन घर खरेदी करताना दिसतायत. सोशल मीडिया पोस्ट करत अनेक कलाकारांनी आपल्या नवीन घराचे फोटो देखील शेअर केले आहेत. अशातच काही दिवसांपूर्वी आई कुठे काय करते फेम मिलिंद गवळी यांनी महेश टिळेकर यांच्यामुळे माझे मुंबईतील पहिलं घर झाल्याचे म्हणत आभार मानले होते. यानंतर महेश टिळेकर यांनी देखील मिलिंद गवळी यांचे कौतुक केले आहे. शिवाय त्यांनी एका मराठमोळ्या अभिनेत्रीचं नाव न घेता तिची कान टोचणी केली आहे. सध्या त्यांची ही पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे.
प्रसिद्ध चित्रपट लेखक, निर्माता आणि दिग्दर्शक महेश टिळेकर हे सोशल मीडियावर विविध विषयांवर आधारित पोस्ट शेअर करतात. त्यांच्या पोस्ट नेटकऱ्यांचे लक्ष वेधत असतात. नुकतीच महेश टिळेकर यांनी एक पोस्ट शेअर करुन अभिनेते मिलिंद गवळी यांचे कौतुक केले आहे. तसेच महेश टिळेकर यांनी काही कलाकारांबाबत देखील या पोस्टमध्ये लिहिलं आहे. त्यांच्या पोस्टचं नावचं कृतज्ञ आणि कृतघ्न कलाकार असं आहे. यावरून त्यांना काय म्हणायचे आहे, हे अनेकांच्या लक्षात आलं आहे. पण त्यांच्या या पोस्टमध्ये त्यांनी केलेल्या एका अभिनेत्रीचा उल्लेख, तिच्याबद्दल जाणून घ्यायची सर्वांनी उत्सुकता लागली आहे. अनेकांनी कमेंट करत विचारलं देखील आहे.
advertisement
महेश टिळेकर यांनी या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, कलाक्षेत्रात गेली तीस एक वर्ष काम करीत असताना आपण केलेल्या संघर्षाची जाणिव ठेवून इतरांना जमेल तशी मदत करण्याचा मी नेहमीच प्रयत्न केला.पण नंतर मुखवट्या मागचे खरे चेहरे कळल्यावर आपण मदत केलेले हेच ते कलाकार का? हा प्रश्न नेहमीच पडायचा. पण काही बोटावर मोजणारे आहेत की ज्यांनी जाहीरपणे कृज्ञतापूर्वक केलेल्या मदतीची जाणीव व्यक्त केली. त्यातीलच एक अभिनेता मिलिंद गवळी.
advertisement
बऱ्याच कलाकारांची हयात जाते पण मुंबईत हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण होत नाही. काही उत्तम ,नावाजलेले कलाकार मरेपर्यंत भाड्याच्या घरातच राहिल्याचं मी अगदी जवळून पाहिलं आहे. आपल्या ओळखीचा , नावाचा फायदा आपल्या बरोबर इतरही मराठी कलाकारांना व्हावा, त्यांचीही मुंबईत हक्काची घरे व्हावीत म्हणून मी 15 वर्षांपूर्वी प्रयत्न सुरू केले.अनेक खस्ता खाल्ल्यावर प्रयत्नांना यश आले आणि माझ्या बरोबर 12 गरजू ( त्यावेळी 13 वर्षांपूर्वी )कलाकार आणि तंत्रज्ञांना 2012 मध्ये सरकारी कोट्यातून मी माफक किमतीतील घरे मुंबईतील उच्चभ्रू भागात मिळवून दिली. त्यावेळी ज्यांना घरे मिळवून दिली त्या सर्व मराठी कलाकारांच्या चेहऱ्यावरचा ओसंडून वाहणारा आनंद पाहून खूप समाधान वाटलं होतं. पण हे समाधान फार काळ टिकले नाही. चार एकजण सोडले तर इतरांनी काम झाल्यावर सरड्या प्रमाणे रंग बदलले. घरी जेवायला चहाला नक्की यायचं तुम्ही असं हक्काने म्हणणाऱ्या कलाकारांनी घरात रहायला येऊन वर्षे होऊन गेली तरी घरी काही बोलावलं नाही आणि चांगली किंमत आल्यावर हे कलाकार घरे विकून करोडो रुपयांचा नफा मिळवून मोकळे. असे कर्म दरिद्री कलाकार पाहिल्यावर आपल्या ह्याच मराठी कलाकारांसाठी आपण रक्त आटवून प्रयत्न केले याचा पश्चाताप नक्कीच झाला.
advertisement
यातल्या एका कलाकाराला बँकेचे हफ्ते भरायला पैसे नसताना अनेकदा आर्थिक मदत करूनही पैसे परत मिळवताना या कलाकाराने माझ्या तोंडचं पाणी पळवले होते वर " इतकं काय पैश्यासाठी मागे लागलात ,तुम्हाला काय कमी आहे?" अमुक एक तारखेला पैसे परत देतो असा शब्द देऊनही अनेक वेळा ते पैसे वेळेवर परत न करणाऱ्या कलाकाराला वेळोवेळी पार्ट्या करायला, बाहेर फिरायला जायला पैसे असायचे .
advertisement
एका अभिनेत्रीने तर माझ्या एका तंत्रज्ञानाला मिळालेला आणि चांगला व्ह्यू असलेला फ्लॅट, तिचा लकी नंबर असल्याचं सांगून तो फ्लॅट तिला मिळवून देण्यासाठी मला विनंती केली. मी सांगितल्यामुळे आणि मीच फ्लॅट मिळवून दिला असल्यामुळे माझ्या एका शब्दावर त्याने स्वतः चा फ्लॅट त्या अभिनेत्रीला ट्रान्स्फर केला आणि तिचा फ्लॅट त्याने घेतला. ही अभिनेत्री तिला लकी नंबर असलेल्या फ्लॅट मध्ये कधीच रहायला आली नाहीच. तिच्या वेग वेगळ्या कलाकार मित्रांबरोबर फक्त क्षणभर विश्रांतीसाठी च तिथे यायची. पाच वर्षांनी तिथे तो फ्लॅट विकला तेंव्हा चांगला व्हू असल्यामुळे तिला त्या फ्लॅटचे ज्यादा पैसे मिळाले . करोडो रुपये मिळूनही या कृतघ्न अभिनेत्रीच्या मनात साधा विचारही आला नाही की ज्या व्यक्तीने त्याचा फ्लॅट आपल्याला ट्रान्स्फर केला त्या तंत्रज्ञाला माणुसकी म्हणून काहीतरी द्यावे.फोन करून मी तिला झापल्या वर तिच्या नशिबात होता म्हणूनच तिला तो फ्लॅट मिळाल्याचे तिने उत्तर दिले आणि " तुमची एवढीच इच्छा असेल मी त्याला काही द्यावे तर मी त्याला चांदीचे एक निरांजन गिफ्ट देते " असं ती बोलल्यावर तिच्यात किती दानत आहे याचा मला अंदाज आला .याच अभिनेत्रीने नंतर एका मोठ्या हुद्द्यावर असलेल्या पैसेवाल्या अधिकाऱ्या बरोबर लग्न केले . काही महिन्यांपूर्वी एका टीव्ही चॅनेलवर ही अभिनेत्री तिच्या नवऱ्या बरोबर समाजकारणात येणार असल्याचे कळवून सांगत होती. तो तिचा अभिनय पाहून मी थक्क झालो.
advertisement
अभिनेता मिलिंद गवळी सारखे केलेल्या मदतीची जाणीव ठेवणारे काही कलाकार आहेत म्हणून काही कलाकारांमध्ये माणुसकी आहे याची प्रचिती येते. महेश टिळेकर यांच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. एकानं म्हटलं आहे की, त्या अभिनेत्रीचे दाऊद शी संबंधआहेत सर जरा जपून तर एकानं म्हटलं आहे की, मराठी चित्रपट सृष्टीत तुमच्यासारख्या हंटर घेतलेल्या।माणसाची गरज आहे. इथे पण ग्रुप आहेत. तुमच्या सामाजिक कार्याला सलामअशाचं एकानं एक नाव घेत म्हटलं आहे की,क्रांती रेडकर नाव आहे का त्या अभनेत्रींचे...आता या नेटकऱ्याच्या प्रश्नाचं महेश टिळेकर उत्तर देतात का हे पाहणं उत्सुकतेचे ठरणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 11, 2023 5:02 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
'याच अभिनेत्रीने नंतर एका पैसेवाल्या अधिकाऱ्याबरोबर लग्न केले' महेश टिळेकरांचा नेमका रोख कोणाकडे?