मुंबई-पुणे हायवेवर 'या' मराठी कलाकारांचा झाला होता अपघाती मृत्यू, अभिनेत्याच्या 2 वर्षाच्या मुलाचा देखील याच रस्त्याने घेतला जीव
- Published by:News18 Trending Desk
- Written by:News18 Marathi
Last Updated:
मुंबई-पुणे हायवे सतत कोणत्या कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. कधी टोलमुळे तर कधी वाहतूक कोंडीमुळे.या चर्चित मुंबई-पुणे हायवेवर काही मराठी कलाकरांचा देखील अपघाती मृत्यू झाला होता. सर्वात वाईट म्हणजे एका अभिनेत्याचा तर या अपघातात मृत्यू झालाच पण त्याच्या दोन वर्षाच्या मुलाचा देखील या अपघातात मृत्यू झाला होता.
मुंबई, 11 सप्टेंबर : मुंबई-पुणे हायवे सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. कधी टोलमुळे तर कधी वाहतूक कोंडीमुळे. याशिवाय या मार्गवर अपघात देखील होत असतात, यामुळे अनेकांना जीव देखील गमवावा लागला आहे. अनेक सेलेब्सच्या गाडील या मार्गावर अपघात झाल्याचे देखील समोर आले आहे. या चर्चित मुंबई-पुणे हायवेवर काही मराठी कलाकरांचा देखील अपघाती मृत्यू झाला होता. सर्वात वाईट म्हणजे एका अभिनेत्याचा तर या अपघातात मृत्यू झालाच पण त्याच्या दोन वर्षाच्या मुलाचा देखील या अपघातात मृत्यू झाला होता. याबद्दलच आपण आज जाणून घेणार आहे.
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर झालेल्या अपघातात मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री भक्ती बर्वे,लोकप्रिय अभिनेते आनंद अभ्यंकर आणि अक्षय पेंडसे यांचा समावेश आहे.
भक्ती बर्वे यांचा याच रस्त्याने घेतला जीव
बालकलाकार ते मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री असा प्रवास करणाऱ्या भक्ती बर्वे यांचे 12 फेब्रुवारी 2001 अपघातात निधन झालं होतं. त्यांच्या गाडीला वाई येथून मुंबईला परतताना अपघात झाला होता. हा अपघात मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर झाला होता. गणेशोत्सवात छोट्या छोट्या नकलांपासून त्यांच्या अभिनयाला सुरुवात झाली होती. त्यांचे उत्तम पाठांतर असल्याने त्यांना पुढे आकाशवाणीवर काम करण्याची संधी मिळाली होती. त्या दूरदर्शनवर निवेदन करीत होत्या. त्या उपजत अभिनेत्री असल्यामुळं त्यांनी केलेली जवळजवळ सर्वच नाटके सुपर हिट ठरली होती.
advertisement
नाटक आणि भक्ती बर्वे हे समीकरणच तयार झाले. त्याकाळी नाटकांना वन्स मोअर मिळत असे. त्यामुळेच मराठी रंगभूमीतील भक्ती बर्वे या एकमेव स्त्री स्टार म्हणावे लागेल. आकाशवाणीवर आणि दूरदर्शनवर भक्ती बर्वे निवेदिका होत्या. 'ती फुलराणी' हे नाटक म्हणजे भक्ती बर्वे यांच्या भूमिकेतील अतुच्य क्षण. 'ती फुलराणी' चे एक हजाराहून अधिक प्रयोग झाले.
advertisement

अभिनेत्याच्या दोन वर्षाच्या मुलाचाही मृत्यू
अभिनेते आनंद अभ्यंकर आणि अक्षय पेंडसे यांचे अपघातात निधन झाले होते. मुंबई-पुणे महामार्गावर त्यांच्या गाडीचा अपघात झाला होता. मुंबई-पुणे दृदगती मार्गावरील उर्से टोलनाक्याजवळ बऊर गावानजीक त्यांचा अपघात झाला होता. ही घटना 23 डिसेंबर 2012 मध्ये घडली होती. त्यांच्या मारुती व्हॅगनार गाडीला भरधाव टेम्पोने धडक दिल्याने ही दुर्घटना घडली होती. यामध्ये आनंद अभ्यंकर आणि अक्षय पेंडसे यांच्याबरोबरच अक्षयच्या दोन वर्षाच्या मुलाचा प्रत्युषचाही मृत्यू झाला होता. या अपघातामुळे संपूर्ण कलाविश्व हादरलं होतं.
advertisement

या दुर्घटनेमुळे दोन महत्वाचे कलाकार गमावले
आनंद अभ्यंकर हे मोठ्या आणि छोट्या पडद्यावरील अत्यंत लोकप्रिय कलाकार होते. 'शुभंकरोती', 'या गोजीरवाण्या घरात' या त्यांच्या गाजलेल्या भूमिका असलेल्या मालिका होत्या. वास्तव, जिस देश में गंगा रहता है, मातीच्या चुली, स्पंदन या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं होते. तर अक्षय पेंडसेने प्रायोगिक रंगभूमीवर अनेक नाटकांमध्ये काम केले होते. माझ्या वाटणीचे खरेखुरे, सिगारेट्स ही प्रायोगिक नाटके, 'मिस्टर नामदेव म्हणे' हे व्यवसायिक नाटक आणि 'उत्तरायण' चित्रपटातील त्याच्या भूमिका विशेष लक्षवेधी ठरल्या होत्या. या दुर्घटनेमुळे मराठी रंगभूमी आणि चित्रपट सृष्टीतील आणखी दोन महत्वाचे कलाकार काळच्या पडद्याआड गेले होते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 11, 2023 2:50 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
मुंबई-पुणे हायवेवर 'या' मराठी कलाकारांचा झाला होता अपघाती मृत्यू, अभिनेत्याच्या 2 वर्षाच्या मुलाचा देखील याच रस्त्याने घेतला जीव