प्रिन्स चार्ल्सला 'किस' करून मराठमोळी अभिनेत्री ब्रिटनमध्ये झाली होती फेमस, काय आहे नेमका किस्सा?

Last Updated:
प्रिन्स चार्ल्सला 'किस' करून मराठमोळी अभिनेत्री ब्रिटनमध्ये झाली होती फेमस
प्रिन्स चार्ल्सला 'किस' करून मराठमोळी अभिनेत्री ब्रिटनमध्ये झाली होती फेमस
10 सप्टेंबर : अभिनेत्री पद्मीनी कोल्हापूरे यांचे आजही लाखो चाहते आहेत. पद्मीनी यांनी अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. 80च्या दशकात एक अशी घटना घडली की संपूर्ण जगात पद्मीनी यांचं नाव कॉन्ट्रोव्हर्सीमध्ये आलं होतं. भारतातच नाही तर परदेशातही त्यांच्या नावाची चर्चा रंगलेली होती. विशेष म्हणजे आजही त्यांना त्या गोष्टीचा पश्चाताप होत असल्याचा त्यांनी सांगितलं होता. नेमका तो किस्सा काय होता याबद्दल आफण जाणून घेणार आहे.
तर गोष्ट आहे 1980 सालची. प्रिन्स चार्ल्स भारताच्या दौऱ्यावर आले होते. भारतात आल्यावर काय तर प्रिन्स यांनी बॉलिवूड सिनेमाची शूटींग बघण्याची लहर आली. आता त्यांना कोण नाही म्हणणार? अधिका-यांची लागलीच लगबग सुरू झाली आणि प्रिन्स चार्ल्स आपल्या ताफ्यासोबत राजकमल स्टुडिओत पोहोचले. या स्टुडिओत पद्मिनी कोल्हापुरे यांच्या ‘आहिस्ता आहिस्ता’ या सिनेमाचं शूटींग सुरु होतं.
advertisement
चार्ल्स आलेत म्हटल्यावर पद्मिनी लगेच त्यांच्या स्वागतासाठी पोहोचल्या. आधी अभिनेत्री शशिकला यांनी प्रिन्स चार्ल्स यांची आरतीचं ताट हातात घेऊन, त्यांना ओवाळून स्वागत केलं आणि नंतर पद्मिनी स्वागतासाठी पुढे आल्यात. पण हे काय? आधी त्यांनी प्रिन्सच्या गालाचं चुंबन घेतलं आणि नंतर त्यांच्या गळ्यात माळ घातली.
advertisement
या प्रकरणाचर चर्चा होणारच होती. कारण त्यावेळी भारतातल्या अभिनेत्रीने किस करणं फार काही सामान्य बाब नव्हती. अगदी सिनेमातही किसचा सीन आला की, दिग्दर्शक दोन फुलं दाखवून पुढे सरकायचे. अशात पद्मिनींनी चार्ल्सच्या गालावर किस केला म्हटल्यावर हे प्रकरण चांगलंच गाजलं होतं. प्रिन्स चार्ल्सचं तेव्हा लग्न झालेलं नव्हतं. त्यामुळे तर अगदी ब्रिटनमध्येही या प्रकरणाची चर्चा झाली होती.
advertisement
advertisement
पद्मिनी यांना आजही याचा पश्चाताप होतो. एका मुलाखतीत त्या यावर बोलल्या होत्या. ‘त्या प्रकरणानंतर अनेक दिवस मला ऑकवर्ड फील व्हायचं. मी ब्रिटनला गेले तेव्हा अगदी इमिग्रेशन ऑफिसरने प्रिन्स चार्ल्सना किस करणाऱ्या तुम्हीच का? असं मला विचारलं होतं आणि ते ऐकून मला लाज वाटली होती, असं त्यांनी सांगितलं होतं.
मराठी बातम्या/मनोरंजन/
प्रिन्स चार्ल्सला 'किस' करून मराठमोळी अभिनेत्री ब्रिटनमध्ये झाली होती फेमस, काय आहे नेमका किस्सा?
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement