शिव ठाकरेला भेटल्यावर उत्कर्ष शिंदेच्या आईची अशी होती प्रतिक्रिया; म्हणाली, 'तुमच्या सारखाच ...'
- Published by:News18 Trending Desk
- Written by:News18 Marathi
Last Updated:
'बिग बॉस मराठी'मुळे प्रसिद्धीझोतात आलेल्या शिवने अपार मेहतनीच्या जोरावर स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं.नुकताच शिव ठाकरेचा वाढदिवस झाला. यानिमित्त अभिनेता उत्कर्ष शिंदेनं एक खास पोस्ट लिहिली आहे, सोबत त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देखील दिल्या आहेत.
मुंबई, 10 सप्टेंबर : 'बिग बॉस मराठी'मुळे प्रसिद्धीझोतात आलेल्या शिवने अपार मेहतनीच्या जोरावर स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं. शिव त्याच्या डॅशिंग अंदाजाबरोबरच त्याच्या स्वभावामुळेही ओळखला जातो. त्याचे लाखो चाहते आहेत. नुकताच शिव ठाकरेचा वाढदिवस झाला. यानिमित्त अभिनेता उत्कर्ष शिंदेनं एक खास पोस्ट लिहिली आहे, सोबत त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देखील दिल्या आहेत.
अभिनेता, गायक उत्कर्ष शिंदे सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतो. त्याचे विविध फोटो व व्हिडिओ तो शेअर करत असतो. शिवाय त्याच्या कामाच्या काही अपडेड देखील शेअर करत असतो. उत्कर्षनं नुकतीच शिव ठाकरेसाठी एक खास पोस्ट लिहिली आहे. सोबत शिवचे काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये शिव उत्कर्षची आईसोबत दिसत आहे. यावेळी शिवला भेटल्यावर उत्कर्षची आईंनी काढलेले उद्गार सर्वांचे लक्षवेधून घेत आहेत.
advertisement
उत्कर्ष शिंदेनं म्हटलं आहे की, @shivthakare9 मित्रा तू घरी येऊन गेलास ,नेमका मी शूट ने यायला वेळ झाला,पण आदर्श ने सांगितल्या गप्पा गोष्टी झालेल्या आणि मी घरी येताच मम्मी म्हणाली उत्कर्ष अरे तुमच्या सारखाच वाटला मला शिव.गुणी मुलगा आहे रे.बर पप्पान कडे तुझं कौतुक करुन झालं आहे मम्मीच .ह्यातच मला कळाल मम्मी चा आशिर्वाद तुला मिळाला आहे.तुझे सर्व स्वप्ने आणि इच्छा पूर्ण होवोत. तुझा उत्कर्ष होत राहो,कीर्तिमान हो मित्रा#शिंदेशाहीसलामवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा भावा!" लवकरच भेटू
advertisement
शिव ठाकरेचा जन्म 9 सप्टेंबर रोजी अमरावतीमध्ये झाला. शिवचं त्याच्या कुटुंबीयांबरोबर अगदी जवळचं नातं आहे. अनेक मुलाखतींतूनही त्याने अनेकदा त्याच्या कुटुंबीयांबरोबर असलेल्या नात्याबद्दल भाष्य केलं आहे. शिव सोशल मीडियावरही त्याच्या फॅमिलीबरोबरचे फोटो व व्हिडीओ शेअर करत असतो.
advertisement
सध्या उत्कर्ष शिंदे त्याच्या आगामी वेडात मराठे वीर दौडले सात या सिनेमामुळं चांगलाच चर्चेत आहे. या सिनेमासाठी त्यानं खाल बॉडी बनवली आहे, अनेकदा तो फिटनेसचे व्हिडिओ देखील शेअर करताना दिसतात. उत्कर्षचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. नेहमीच तो त्यांच्यासाठी वेळ काढताना दिसतो. डॉक्टर,. संगीतकार ते अभिनेता असा उत्कुर्षचा प्रवास नक्कीच कौतुकास्पद आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 10, 2023 1:49 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
शिव ठाकरेला भेटल्यावर उत्कर्ष शिंदेच्या आईची अशी होती प्रतिक्रिया; म्हणाली, 'तुमच्या सारखाच ...'