दोन डोहाळे जेवण अन् अभिनेत्रीच्या घरी झालं चिमुकल्या पाहुण्याचं आगमन, खूपच गोड आहे पहिली झलक
- Published by:News18 Trending Desk
- Written by:News18 Marathi
Last Updated:
मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री राधा सागर हिने काही महिन्यांपूर्वीच गोड बातमी देत चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता. राधा सागर हिच्या डोहाळे जेवणाची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली होती.
मुंबई, 10 सप्टेंबर : मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री राधा सागर हिने काही महिन्यांपूर्वीच गोड बातमी देत चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता. राधा सागर हिच्या डोहाळे जेवणाची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली होती. अत्यंत पारंपरिक पद्धतीने तिचं डोहाळे जेवण पार पडलं होतं. या अभिनेत्रीनं दोन डोहाळे जेवण केली होती, तेही थाटात. याचे काही फोटो आणि व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता अभिनेत्रीच्या घऱी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. सोशल मीडिया पोस्ट करत तिनं ही गोड बातमी सर्वांसोबत शेअर केली आहे. सोबत बाळाची पहिली झलक देखील शेअर केली आहे.
राधा सागरनं सोशल मीडिया पोस्ट करत म्हटलं आहे की, आमच्या आयुष्यातील सर्वोत्तम क्षण,आणि आम्हाला मुलगा झाला, तो आल्यावर सगळं कसं चमकत असल्यासारखं वाटतयं. कारण तो थोडा जादुई मुलगा आहे.जीवनाच्या या नवीन प्रवासात आम्हाला आई आणि वडील म्हणून निवडल्याबद्दल धन्यवाद!!! सोबत तिनं बाळाच्या इवल्याशा हाताचा एक गोड फोटो देखील शेअर केला आहे. चाहत्यांकडून राधा सागरवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
advertisement
राधा सागर हिला मुलगा झाला आहे. यापूर्वी देखील राधानं तिच्या या प्रवासातील प्रत्येक अपडेट तिच्या चाहत्यांसोबत शेअर केली होती. राधा हिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. ती यापूर्वी ' आई कुठे काय करते' आणि 'सुंदरा मनामध्ये भरली' या मालिकांमध्ये दिसली.
advertisement
advertisement
काही महिन्यांपूर्वी तिने आपण मालिकांमधून ब्रेक घेत असल्याचं सांगत चाहत्यांसोबत एक पोस्ट शेअर केली होती. त्यानंतर तिने तिच्या मॅटर्निटी शूटचा व्हिडिओ शेअर करत चाहत्यांना आनंदाचा धक्का दिला होता. तिच्यावर चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला होता. त्यानंतर तिच्या डोहाळे जेवणाचे फोटो समोर आले होते. तेव्हाही चाहत्यांनी तिचं भरभरून कौतुक केलं होतं
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 10, 2023 11:59 AM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
दोन डोहाळे जेवण अन् अभिनेत्रीच्या घरी झालं चिमुकल्या पाहुण्याचं आगमन, खूपच गोड आहे पहिली झलक