सलमान खान पुन्हा शूटिंगवर परतला असून त्याने 'बिग बॉस 18' च्या वीकेंडला नुकतीच हजेरी लावली. समोर आलेल्या व्हिडिओमध्ये सलमान भावूक झालेला पाहायला मिळाला.
'डोकं टेकव तरच...' बिष्णोई समाजाकडून सलमान खानला ऑफर, 25 वर्षांची दुश्मनी संपणार?
व्हिडिओमध्ये दिसतंय की, सलमान 'वीकेंड का वार' एपिसोडमध्ये शिल्पा शिरोडकरला बोलत आहे. तो शिल्पाला म्हणतो, “आय हेट टिअर्स शिल्पा. जेव्हा तुमची मुलगी जेवणावर राग व्यक्त करते तेव्हा तुम्ही काय करता?” यावर शिल्पा म्हणजे “राग जेवणावर नव्हता, अॅटिट्यूडवर होता.” “मग अॅटिट्यूडवर राग दाखवा ना. या घरात फीलिंग्सचा नातं नसा.ला पाहिजे. आता माझी फीलिंग आहे की मला आज इथे यायचं नव्हतं. पण जे करावं लागतं ते करावं लागतंच.” सलमानचं हे भावूक बोलणं ऐकून त्याचे चाहतेही भावूक झाले. समोर आलेल्या व्हिडिओवर कमेंट करत ते सलमान खानला सपोर्ट करत आहेत.
advertisement
दरम्यान, बिष्णोई समाज सलमान खानविरोधात आहे. तेव्हापासून सलमानच्या जीवाला धोका आहे. बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर सलमानची सेक्युरिटी आणखी वाढवण्यात आली आहे. अशातच आता बिष्णोई समाजाकडून सलमान खानला ऑफर देण्यात आली आहे.