आर्मी कुटुंबातून येणारी ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून निम्रत कौर आहे. ग्लॅमर जगतात आपलं वेगळं स्थान निर्माण करणारी ही अभिनेत्री लष्करी पार्श्वभूमीतून आली आहे. तिचे वडील, मेजर भूपेंद्र सिंग, हे भारतीय सैन्यात इंजिनिअर अधिकारी होते. मात्र देशसेवेच्या मार्गावर त्यांनी आपल्या प्राणांचीही आहुती दिली.
रितेश देशमुखचा सुपरहिट सिनेमा, बनले 3 साऊथ रिमेक, सीक्वल मात्र Disaster!
advertisement
1994 सालची गोष्ट. निम्रत फक्त 12 वर्षांची होती. तिचे वडील काश्मीरमधील वेरीनाग येथे पोस्टेड होते. त्याचवेळी दहशतवाद्यांनी त्यांचे अपहरण केले. सात दिवस त्यांनी त्यांना बंदिवान बनवले होते. दहशतवाद्यांनी सरकारकडे काही मागण्या ठेवल्या होत्या. त्या मान्य न झाल्याने त्यांनी मेजर भूपेंद्र सिंग यांची निर्घृण हत्या केली. देशासाठी जीव गमावणाऱ्या त्या शूर अधिकाऱ्याचे वय फक्त 44 वर्षे होते.
या धक्क्याचा निम्रतच्या बालपणावर खोल परिणाम झाला. पण या कठीण प्रसंगाने तिला अधिक मजबूत बनवलं. अनेक वर्षांनी दिलेल्या एका मुलाखतीत निम्रतने सांगितलं की, तिने पहिल्यांदा वडिलांचा मृतदेह दिल्लीमध्ये पाहिला, आणि ते क्षण आयुष्यभर विसरणं शक्य नाही.
दरम्यान, आज निम्रत कौर बॉलिवूडमधील एक चर्चेतील नाव आहे. तिने 'एअरलिफ्ट', 'दसवी', 'द लंचबॉक्स', 'द टेस्ट केस' आणि अलीकडील 'कुल' या वेबसीरिजमध्ये दमदार भूमिका साकारल्या.