सोशल मीडियावर त्यांचा एक जुना व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये जया बच्चन नेहमीप्रमाणे रागावलेल्या दिसत नाहीत, उलट त्या हसत-खेळत पापाराझींना पोज देताना दिसत आहेत.
रजनीकांत सोबतची ही मुलगी तुम्हाला आठवतेय का? आता आहे एका मुलाची आई; फोटो पाहून विश्वास बसणार नाही
व्हायरल होत असलेला जया बच्चन यांचा व्हिडीओ अबू जानी आणि संदीप खोसला यांच्या फॅशन इव्हेंटचा आहे. येथे जया बच्चन लाल रंगाच्या सिल्क साडीत आणि क्लासी ज्वेलरीमध्ये आल्या होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीसारखा ताण नव्हता, तर स्मितहास्य होतं. व्हिडीओमध्ये दिसतंय की त्या पापाराझींना म्हणत आहेत, "मी तयार असते तेव्हा काही हरकत नाही… तेव्हा मी फोटो द्यायला तयार असते. पण वैयक्तिक आयुष्यात तुम्ही लोक लपून-छपून फोटो काढता, तेव्हा मला अजिबात आवडत नाही."
advertisement
हे बोलतानाच त्या एका पापाराझीवर मजेत हसल्या आणि म्हणाल्या, "जेव्हा मी तयार नसते आणि तुम्ही फोटो काढता, तेव्हा माझे रंग बाहेर येतात." त्यांचा हा मजेशीर अंदाज पाहून पापाराझीसुद्धा हसू आवरू शकले नाहीत.
व्हिडिओ पाहून अनेकांना धक्का बसला. कारण नेहमीच कॅमेरा पाहून भडकणाऱ्या जया बच्चन यांचा हा हसरा अवतार फारच दुर्मीळ आहे. एका युजरने लिहिलं, "नक्की अमिताभ बच्चन यांनी समजावलं असणार." तर दुसरा म्हणाला, "अखेर जया मॅडमचा मूड बदलला…" काहींनी मात्र खिल्ली उडवत म्हटलं की, "हा जया बच्चनचा यू-टर्न आहे, पुढच्या वेळेस पुन्हा ओरडायला सुरुवात होईल."
दरम्यान, सध्या जया बच्चन संसदेत समाजवादी पक्षाच्या खासदार म्हणून सक्रिय आहेत. अनेकदा त्या सामाजिक प्रश्नांवर थेट आणि ठाम मत मांडताना दिसतात. चित्रपटांच्या बाबतीत बोलायचं झालं तर, गेल्या वर्षी त्या करण जोहरच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ मध्ये दिसल्या होत्या. या चित्रपटातल्या त्यांच्या मातृशक्तीच्या भूमिकेचं खूप कौतुक झालं होतं.