जेमिमा रॉड्रिग्सने एका मुलाखतीत सांगितलं की, काही वर्षांपूर्वी न्यूझीलंडमध्ये भारतीय पुरुष आणि महिला क्रिकेट संघ एकाच हॉटेलमध्ये राहत होते. त्यावेळी जेमिमा आणि स्मृती मानधनाने विराट कोहलीला बॅटिंगबद्दल सल्ला विचारला. विराट कोहलीने तात्काळ त्यांना हॉटेलमधील एका कॅफेमध्ये बोलावलं. त्यावेळी अनुष्का शर्माही तिथे उपस्थित होती.
“तुम्ही महिला क्रिकेटचा चेहरा बदलू शकता!”
जेमिमाने सांगितलं, “पहिल्या अर्ध्या तासात आम्ही फक्त क्रिकेटबद्दल बोललो. त्यावेळी विराटने स्मृती आणि मला एक खूपच मोठी गोष्ट सांगितली. तो म्हणाला, ‘तुम्हा दोघींमध्ये महिला क्रिकेटचा चेहरा बदलण्याची ताकद आहे आणि मला तसं होताना दिसत आहे.” विराट कोहलीच्या या वक्तव्याने जेमिमा आणि स्मृतीला खूप प्रोत्साहन मिळालं, असं ती म्हणाली.
advertisement
मागच्या सीटवरून येत होता 'आह आह' आवाज, ड्रायव्हर घाबरला, आशा भोसलेंनी सांगितला होता 'तो' किस्सा
सर्वांना रेस्टॉरंटमधून बाहेर काढलं
जेमिमाने पुढे सांगितलं की, क्रिकेटवर बोलणं झाल्यावर, ते चार तास आयुष्याबद्दल बोलत होते. तिला असं वाटलं की, जसे काही जुने मित्र खूप वर्षांनी भेटले आहेत आणि गप्पा मारत आहेत. ती हसत म्हणाली, “आम्ही इतक्या गप्पा मारत होतो की, कॅफेच्या कर्मचाऱ्यांनी आम्हाला बाहेर काढलं, तेव्हाच आम्ही थांबलो.”
दरम्यान, विराट कोहली आणि अनुष्का शर्मा प्रसिद्धीपासून दूर राहण्यासाठी लंडनमध्ये शिफ्ट झाले आहेत. असे असले, तरीही विराट आणि अनुष्का कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सतत चर्चेत राहतात.