दिल्लीच्या लाल किल्ल्यावर दरवर्षी आयोजित केल्या जाणाऱ्या कार्यक्रमात पहिल्यांदा एक महिला रावणाच्या पुतळ्याचं दहन करणार आहे. मागील 50 वर्षांपासून ही प्रथा पुरूष पाळत आले आहेत. मात्र यंदा अभिनेत्री कंगना रणौत ही प्रथा मोडून स्वत:च्या हातानं रावणाचा पुतळा दहन करणार आहे. लव कुश रामलीला समितीच्या अध्यक्षांनी म्हटलं आहे की, महिला आरक्षण विधेयकाला संसदेने मंजुरी दिल्यानं हा निर्णय घेण्यात आला आहे.
advertisement
हेही वाचा - राणी मुखर्जी आणि काजोल सोबत दुर्गा पूजेत सहभागी झाली कतरिना कैफ; पाहा फोटो
अध्यक्षांनी पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, दरवर्षी या कार्यक्रमाला एक VIP व्यक्ती उपस्थित असतात. मागील वर्षी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी कार्यक्रमाला उपस्थित होते. त्याचप्रमाणे अभिनेता अजय देवगण आणि जॉन अब्राहम देखील सहभागी झाले होते. अभिनेता प्रभासच्या हस्ते रावणाचं दहन करण्यात आलं होतं. यंदा कंगना रणौत रावण दहन करणार आहे.
"24ऑक्टोबरला मी लाल किल्ल्यांवर आयोजित केलेल्या रामलीलामध्ये सहभागी होण्यासाठी येत आहे. मी रावण दहन करण्यासाठी येत आहे. चांगल्या गोष्टींनी वाईटचा नाश करण्यासाठी. तुम्हीही या रामलीलामध्ये सहभागी व्हा. त्याचप्रमाणे 27 ऑक्टोबर माझा तेजस हा सिनेमा देखील पाहायला विसरू नका. हा सिनेमा भारतीय वायुसेनेवर आधारित आहे. लवकरच भेटू", असं आवाहन कंगनानं व्हिडीओ शेअर करत केलं आहे.
अभिनेत्री कंगना रणौतच्याचा तेजस हा सिनेमा येत्या 27 ऑक्टोबरला रिलीज होणार आहे. त्याचप्रमाणे इमरजन्सी हा सिनेमा 24 नोव्हेंबरला रिलीज होणार होता मात्र सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली असून सिनेमा 2024मध्ये रिलीज करण्यात करण्यात आलं. दोन बॅक टू बॅक सिनेमे रिलीज होत असल्यानं रावण दहन हा कंगनाचा प्रमोशनल स्टंट असावा असं म्हटलं जात आहे.