Walking Dead या लोकप्रिय हॉलिवूड वेब सीरिजमधून अभिनेत्री केली मॅकनं या जगाचा निरोप घेतला. केलीच्या कुटुंबीयांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित तिच्या निधनाची माहिती दिली. त्यांनी लिहिलं, "हे सांगताना खूप दु:ख होत आहे की आमची प्रिय केली आता आपल्यात नाही. ती सर्वांना सोडून कायमची निघून गेली आहे."
( पबमध्ये दारू पिऊन धिंगाणा, बॉलिवूडच्या सुपरस्टार सिंगरच्या लेकाला तरुणीने मारली थप्पड! कोण आहे तो?)
advertisement
मेंदूच्या कर्करोगामुळे झाला मृत्यू
मिळालेल्या माहितीनुसार, केली मॅक ग्लिओमा नावाच्या मेंदूच्या कर्करोगाने (brain cancer) ग्रस्त होती. याच आजारामुळे तिचं Cincinnati अमेरिका येथे निधन झालं. केलीचा जन्म 10 जुलै 1992 रोजी झाला होता. केलीने अगदी लहान वयातच अभिनय क्षेत्रात पाऊल टाकलं होतं. कमी वेळातच तिच्या उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर तिने हॉलिवूडमध्ये स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं. तिच्या जाण्याने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
Walking Dead मुळे मिळाली लोकप्रियता
केलीने अनेक चित्रपट आणि वेब सिरीजमध्ये काम केलं होतं. Walking Dead या वेब सीरिजमुळे तिला खरी ओळख मिळाली. याशिवाय तिने 9-1-1 Chicago, Scold the Modern Family यासारख्या प्रोजेक्ट्समधील तिच्या भूमिकाही प्रेक्षकांच्या लक्षात राहिल्या.
हॉलिवूडमध्ये शोकसागर
केली मॅकच्या अकाली निधनामुळे हॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीमध्ये दुःखाचं वातावरण आहे. चाहत्यांनी सोशल मीडियावर तिला श्रद्धांजली अर्पण केली आहे. तिचं नाव आणि काम अनेक वर्षे प्रेक्षकांच्या मनात जिवंत राहील.
काय आहे ग्लिओमा
ग्लिओमा हा एक ब्रेन ट्यूमर आहे जो हळूहळू पाठीच्या कण्यापर्यंत पसरतो आणि नंतर मेंदूपर्यंत पोहोचतो. त्यात असलेल्या पेशी मेंदूच्या न्यूरॉन्सना आधार आणि संरक्षण देतात परंतु जेव्हा ते असामान्यपणे वाढू लागतात तेव्हा ते ट्यूमरचे रूप धारण करतात.