'आरपार' या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान ललित प्रभाकर 'जस्ट नील थिंग्स'ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला,"मेरी दुल्हन तो आझादी ही. मला असं वाटतं की, ही खूप जबाबदारीची गोष्ट आहे. आणि मी आता त्यासाठी तयार नाही. कारण आता माझं ध्येय वेगळं आहे. माझं काम आणि यासगळ्यात खूप गोष्टी सुरू आहेत. आणि हे सगळं करताना मला मजा पण येत आहे. मला असं वाटतं की, मी लग्नासाठी पूर्णपणे तयार नाही. त्यामुळे असं अशताना मला लग्न करुन माझ्यावर आणि इतर कोणावरही अन्याय करायचा नाही".
advertisement
'माझी गर्लफ्रेंड होती, तेव्हा आईचा बॉयफ्रेंड...', कुनिका सदानंदच्या अफेअरबद्दल स्पष्टच बोलला लेक अयान लाल
ललितच्या 'आरपार'ची प्रेक्षकांना प्रतीक्षा!
ललित प्रभाकर आणि हृता दुर्गुळे यांचा 'आरपार' हा चित्रपट येत्या 12 सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या रोमँटिक चित्रपटाची सध्या चांगलीच चर्चा आहे. महाविद्यालयीन विद्यार्थांसाठी 'आरपार' या चित्रपटाचा खास शो आयोजित करण्यात आला होता. हा पहिलाच शो हाऊसफुल्ल होता. एकंदरीच यावरुनच या चित्रपटाला प्रेक्षकांचं 'आरपार' प्रेम मिळणार हे सिद्ध होतं.
ललित प्रभाकर व हृता दुर्गुळे या दोघांच्याही वाढदिवसादिनी म्हणजे १२ सप्टेंबर रोजी हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. ललित व हृता यांचा वाढदिवस १२ सप्टेंबरला असतो आणि याच दिवशी त्यांचा हा पहिल्यांदाच एकत्रित काम केलेला 'आरपार' सिनेमा प्रदर्शित होणार आहे. दोन्ही कलाकारांसाठी ही अगदीच आनंदाची बाब आहे. आणि या कलाकारांच्या चाहत्यांसाठी ही पर्वणीच म्हणायला हवी. हृता व ललित यांनी या चित्रपटासाठी पहिल्यांदाच एकत्रित काम केलं आहे. अर्थात ही जोडी एकत्र खूपच सुंदर दिसत असून त्यांचा रोमँटिक अंदाज प्रेक्षकांना नक्कीच भावणारा आहे. ‘प्रेमात अधलं मधलं काही नसतं', याचे वर्णन दर्शविणारा हा सिनेमा आहे.