लता बाईंनी गायलेल्या अनेक एक लोकप्रिय गामं म्हणजे 'लग जा गले' हे एक अत्यंत संस्मरणीय गाणं मानलं जातं. 1964 मध्ये आलेल्या 'वो कौन थी' या चित्रपटातलं हे गाणं आजही कोट्यवधी लोकांचं आवडतं आहे. पण या गाण्याचा प्रवास सुरू होताना एक वेगळीच घटना घडली होती.
( 'डर्टी PR गेम, दाखवून दिलंस तू काय आहेस', दीपिका पादुकोणवर का भडकलाय अॅनिमलचा डायरेक्टर? )
advertisement
दिग्दर्शकाला नाही आवडलं गाणं
सुरुवातीला दिग्दर्शक राज खोसला यांना हे गाणं अजिबात आवडलं नव्हतं. त्यांनी थेट गाणं नाकारलं. संगीतकार मदन मोहन यांना हे पचवता आलं नाही. त्यामुळे त्यांनी अभिनेता मनोज कुमार यांची मदत घेतली. मदन मोहन म्हणाले, "राज वेडा झालाय. गाणं नाकारतोय, तू ये आणि काहीतरी कर."
मनोज कुमार यांनी काढली समजूत
मनोज कुमारने ते गाणं ऐकलं नव्हतं. पण तो गोंधळला होता. शेवटी तो एन. एन. सिप्पी या निर्मात्याशी बोलायला गेला. सिप्पी यांनाही गाणं चांगलं वाटत होतं. शेवटी गाणं राज खोसला यांच्यासमोर पुन्हा सादर करण्यात आलं.
गाणं ऐकून दिग्दर्शकाचं मन बदललं
जेव्हा राज खोसला यांनी पुन्हा हे गाणं ऐकलं तेव्हा त्यांना मोठा धक्का बसला. त्यांनी स्वतःच्या मूर्खपणाची कबुली दिली आणि म्हणाले, "मी किती मोठा गोंधळ घातला होता!" त्यांनी आपल्या हातातला बूट उचलून स्वतःला मारण्याचा अभिनय देखील केला. ही गोष्ट त्यांच्या 'राज खोसला: द ऑथराइज्ड बायोग्राफी' या पुस्तकात नमूद केली आहे.
'लग जा गले' बनलं इतिहास
हे गाणं लता मंगेशकर यांनी त्यांच्या सहा आवडत्या गाण्यांपैकी एक मानलं होतं. युट्यूबवर या गाण्याला आजवर 277 मिलियन पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. संगीतकार मदन मोहन यांनी दिलेला सूर आणि लता दीदींचा आवाज यामुळे हे गाणं काळाच्या पलीकडे गेलं. लता मंगेशकर म्हणाल्या, "रेकॉर्डिंगनंतर मदन भैय्या मला मिठी मारून रडले. आम्ही सगळे फार खूश होतो."