'डर्टी PR गेम, दाखवून दिलंस तू काय आहेस', दीपिका पादुकोणवर का भडकलाय अ‍ॅनिमलचा डायरेक्टर?

Last Updated:

sandeep reddy vanga angry on deepika padukone : परेश रावल यांनी 'हेरा फेरी'मधून एक्झिट घेतली. संदीप रेड्डी वांगा यांनी दीपिका पादुकोणवर टीका केली आहे. दीपिकाने 'स्पिरिट'मधून बाहेर पडल्यामुळे वांगा नाराज आहेत.

News18
News18
मुंबई : हेरा फेरी या सिनेमातून ज्येष्ठ अभिनेते परेश रावल यांनी एक्झिट घेतली. त्यांच्या एक्झिटनंतर सिनेसृष्टीत चर्चा सुरू आहेत. एकीकडे हेरा फेरी कॉन्ट्रेवर्सी सुरू असताना दुसरीकडे साऊथचा प्रसिद्ध डायरेक्टर संदीप रेड्डी वांगा देखील संतापला आहे. त्याने देखील सोशल मीडियावर पोस्ट लिहित संताप व्यक्त केला आहे. त्याने थेट अभिनेत्री दीपिका पादुकोणवर टीका केली आहे.
'कबीर सिंग' आणि 'अ‍ॅनिमल' सारखे ब्लॉकबस्टर चित्रपट देणारे दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा सध्या त्यांच्या एका पोस्टमुळे चर्चेत आहेत. त्यांनी थेट नाव न घेता दीपिका पदुकोणवर सडकून टीका केली आहे. वांगांचा आरोप आहे की, दीपिकाने 'स्पिरिट' चित्रपटातून अचानक बाहेर पडून नंतर माध्यमांमध्ये चुकीची माहिती पसरवली आणि डर्टी पीआर खेळ खेळला.
advertisement

दीपिका पदुकोणची 'स्पिरिट'मधून एक्झिट

काही दिवसांपूर्वी बातमी आली होती की दीपिका पदुकोण प्रभाससोबतच्या 'स्पिरिट' चित्रपटातून बाहेर पडली आहे. रिपोर्टनुसार, दीपिकाने कामाचे तास, संवाद, फी आणि नफ्यात वाटा यासंदर्भात काही अटी घातल्या होत्या. तसेच 'ए' ग्रेड दृश्यांमुळे तिने चित्रपट सोडल्याचे सांगण्यात आले. या सगळ्या बातम्यांनंतर अभिनेत्री तृप्ती डिमरीची या चित्रपटात एंट्री झाली.
advertisement

संदीप वांगांचा संताप सोशल मीडियावर उमटला

या सर्व घडामोडींनंतर संदीप रेड्डी वांगा यांनी एक मोठी पोस्ट करत आपला संताप व्यक्त केला. त्यांनी लिहिलंय. "जेव्हा मी एखाद्या अभिनेत्याला कथा सांगतो तेव्हा मी 100% विश्वास ठेवतो. आमच्यात एक न बोललेला NDA असतो. पण तुमचं वागणं हे स्पष्ट करतं की तुम्ही काय आहात. तुम्ही तुमच्यापेक्षा लहान अभिनेत्रींचा अपमान करता, कथा उघड करता आणि मग स्वतःला स्त्रीवादी म्हणवता? तुम्हाला हे कधीच समजणार नाही. पुढच्या वेळी संपूर्ण गोष्ट बोला… कारण मला काहीही फरक पडत नाही. #DirtyPRGames. मला ही म्हण खूप आवडते, खुंदक में बिल्ली खंबा नोचे!"
advertisement

तृप्ती डिमरीवर टीका, दीपिकाच्या एक्झिटनंतर नाराजी

वांगांनी आपल्या पोस्टमध्ये तृप्ती डिमरीबद्दलही अप्रत्यक्षपणे टिप्पणी केली. त्यांना वाटतं की, दीपिकाने आधी चित्रपटात सहभाग घेतला आणि मग बाहेर पडून कथेसोबत इतरांचेही नुकसान केलं. "मी माझ्या कलाकृतीसाठी वर्षानुवर्षे मेहनत घेतली आहे. चित्रपट माझं सर्वस्व आहे. पण काही लोकांना ते कधीच समजणार नाही", असं ते म्हणाले.
advertisement

दीपिकाकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया नाही

सध्या तरी दीपिका पदुकोणने या प्रकरणावर कोणतंही अधिकृत विधान दिलेलं नाही. मात्र वांगाच्या पोस्टनंतर सोशल मीडियावर तुफान चर्चा सुरु आहे.
मराठी बातम्या/मनोरंजन/
'डर्टी PR गेम, दाखवून दिलंस तू काय आहेस', दीपिका पादुकोणवर का भडकलाय अ‍ॅनिमलचा डायरेक्टर?
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement